IPL 2025 : KKR चा नवा कॅप्टन कोण? श्रेयसनंतर पुन्हा मुंबईकरच करणार नेतृत्त्व?

Who will be next captain of KKR, IPL 2025 : कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) पुढील कॅप्टन कोण असेल? याची सर्वांना उत्सुकता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Who will be next captain of KKR, IPL 2025 : गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलेलं आयपीएल 2025 मेगा ऑक्शन पूर्ण झालं आहे. सौदी अरेबियातील जेद्दामध्ये रविवार आणि सोमवार (24 आणि 25 नोव्हेंबर) रोजी हे मेगा ऑक्शन झालं. आयपीएल 2024 सिझनची विजेती टीम कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) पुढील कॅप्टन कोण असेल? याची सर्वांना उत्सुकता आहे.

आयपीएल 2024 मध्ये श्रेयस अय्यर केकेआरचा कॅप्टन होता. पण, या सिझनपूर्वी त्याला केकेआरनं रिटेन केलं नव्हतं. यंदाच्या ऑक्शनमध्ये पंजाब किंग्जनं श्रेयस अय्यरला मोठी किंमत देऊन खरेदी केलं. तो आता पंजाबचा कॅप्टन होणार हे जवळपास स्पष्ट आहे. पण, आयपीएल विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन कोण होणार याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोलकाता नाईट रायडर्सचा नवा कॅप्टन म्हणून काही नावं चर्चेत आहेत. वेस्ट इंडिजचा कॅप्टन शाही होप, ऑलराऊंडर व्यंकेटश अय्यर, अनुभवी सुनील नरीन तसंच आक्रमक खेळाडू रिंकू सिंह ही नावं केकेआरच्या कर्णधारपदासाठी चर्चेत आहेत. पण, केकेआरनं ऑक्शनमधील अगदी शेवटच्या टप्प्यात अनुभवी अजिंक्य रहाणेला खरेदी केलं. त्यामुळे आता अजिंक्य रहाणेचं नाव कॅप्टनसीसाठी सर्वात आघाडीवर आहे.

का आहे चर्चा?

मुंबईकर अजिंक्य रहाणे हा कुशल कॅप्टन म्हणून क्रिकेट विश्वात प्रसिद्ध आहे. त्याच्या नेतृत्त्वाखालीच मुंबईनं यंदा रणजी तसंच इराणी ट्रॉफीचं विजेतेपद मिळवलंय. आयपीएलमध्येही राजस्थान रॉयल्सची कॅप्टनसी त्यानं केलीय. त्याचबरोबर 2021 साली ऑस्ट्रेलियालाला ऑस्ट्रेलियात हरवून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सीरिज जिंकणाऱ्या टीम इंडियाचाही अजिंक्य रहाणे कॅप्टन होता. प्रमुख खेळाडू उपलब्ध नसताना अजिंक्यनं ती सीरिज जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. 

Advertisement

( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi : 13 वर्षांच्या मुलाची आयपीएलमध्ये एन्ट्री, भारताकडून झळकावलीय सेंच्युरी )

कोलकाता नाईट रायडर्सचे हेड कोच चंद्रकांत पंडित हे देखील मुंबईकर आहेत. त्यामुळे दोघांनाही एकमेकांच्या कामाची पद्धत माहिती आहे. त्याचबरोबर बॉलिंग कोच भरत अरुण यांच्यासोबतही अजिंक्यनं टीम इंडियामध्ये काम केलंय. भारतानं 2021 मध्ये ऑस्ट्रेलियात सीरिज जिंकली त्यावेळी अजिंक्य कॅप्टन आणि अरुण बॉलिंग कोच होते. केकेआरच्या सध्याच्या टीममधील सर्व खेळाडूंमध्ये कॅप्टनसीचा चांगला रेकॉर्ड अजिंक्यचा आहे. त्यामुळे त्याच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे.

टीम मॅनेजमेंटनं दिलं उत्तर 

कोलकाता नाईट रायडर्सचे CEO व्यंकी मैसूर यांनी अजिंक्य रहाणे कॅप्टन होणार का? या विषयावर उत्तर दिलंय. अजिंक्य रहाणेला कॅप्टन करायचं की नाही हा निर्णय टीम मॅनेजमेंटच्या बैठकीत घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. 'आम्हाला या विषयावर एकत्र बसून आढावा घ्यावा लागेल. तुम्हाला एकत्र बसून या विषयावर विचार करावा लागेल. सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल. आम्ही या विषयावर चर्चा करु. त्या चर्चेतून योग्य उत्तर निघेल,' हा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 

Advertisement
Topics mentioned in this article