IPL 2025 Mega Auction Live Day 1: सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये आयपीएल 2025 चं ( Indian Premier League, IPL) मेगा ऑक्शन होत आहे. रविवार आणि सोमवारी (24 आणि 25 नोव्हेंबर) रोजी हे ऑक्शन होणार आहे. या ऑक्शनमध्ये तब्बल 577 खेळाडू शॉर्टलिस्ट झाले आहेत.
ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अर्शदीप सिंग हे प्रमुख भारतीय खेळाडू यंदाच्या ऑक्शनमध्ये आहेत. त्यामुळे यंदा त्यांना खरेदी करण्यासाठी 25 कोटींपेक्षा जास्त बोली लागली जाऊ शकते. आयपीएल 2025 मेगा ऑक्शमधील प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यासाठी हे पेज दिवसभर नियमित व्हिजट करा, तसंच रिफ्रेश करा.
IPL 2025 Mega Auction Live: लखनौला मिळाला मिलर
दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक बॅटर डेव्हिड मिलर आगामी सिझनमध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसेल. मिलरला लखनौनं 7 कोटी 50 लाखांना खरेदी केलं.
IPL 2025 Mega Auction Live: मोहम्मद शमीला SRH नं केलं खरेदी
टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीला सन रायझर्स हैदराबादनं खरेदी केलं आहे. शमीला हैदराबादनं 10 कोटी रुपयांना खरेदी केलं.
IPL 2025 Mega Auction Live: ऋषभ पंत ठरला सर्वात महागडा खेळाडू
ऋषभ पंत आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला तब्बल 27 कोटी रुपयांना लखनौ सुपर जायंट्सनं खरेदी केलं.
पंतपूर्वी श्रेयस अय्यर सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला पंजाब किंग्जनं 26 कोटी 75 लाखांना खरेदी केलं होतं.
IPL 2025 Mega Auction Live: श्रेयस अय्यरनं मोडले सर्व रेकॉर्ड
आयपीएल इतिहासातील आजवरची सर्वात मोठी बोली श्रेयस अय्यरवल लागली आहे. श्रेयसला 26 कोटी 75 लाख रुपयांना पंजाब किंग्जनं खरेदी केलं आहे.
यापूर्वी लिलावातील सर्वात महगड्या खेळाडूचा रेकॉर्ड मिचेल स्टार्कच्या नावावर (24 कोटी 75 लाख) होता. तो श्रेयसनं मोडला आहे. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूनं 25 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
IPL 2025 Mega Auction Live: कागिसो रबाडा गुजरातकडून खेळणार
दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर कागिसो रबाडाला 10 कोटी 75 लाखांमध्ये गुजरात टायटन्सकं खरेदी केलं आहे. यापूर्वी रबाडा पंजाब किंग्जचा सदस्य होता.
IPL 2025 Mega Auction Live: अर्शदीप सिंगला मोठी बोली
टीम इंडियाचा फास्ट बॉलर अर्शदीप सिंगला 18 कोटी रुपयांमध्ये पंजाब किंग्जनं RTM च्या माध्यमातून रिटेन केले आहे.
IPL 2025 Mega Auction Live: आयपीएल मेगा ऑक्शनला सुरुवात
आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनला सुरुवात झाली आहे. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच सौदी अरेबियात ऑक्शन होत आहे. 204 जागांसाठी 577 खेळाडू या ऑक्शनसाठी शॉर्टलिस्ट झाले आहेत.
IPL 2025 Mega Auction LIVE Updates : टीम मालकांचं लिलावासाठी आगमन
आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनला काही वेळातच सुरुवात होत आहे. त्यासाठी टीम मालक आणि त्यांच्या थिंक टँकचं ऑक्शनच्या ठिकाणी आगमन होत आहे.
पंजाब किंग्जची मालकीन प्रिती झिंटा तिच्या टीमसह दाखल झालीय.
IPL 2025 Mega Auction Live: कोणत्या 12 खेळाडूंवर असेल सर्वाधिक लक्ष
आयपीएल मेगा ऑक्शनसाठी प्रमुख खेळाडूंचे दोन मर्क्युरी सेट तयार करण्यात आले आहेत. या दोन सेटमधील 12 खेळाडूंचा लिलाव पहिल्यांदा होणार आहे. या सेटमधील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसंच आयपीएलमध्ये स्वत:ची क्षमता सिद्ध केलीय. त्यामुळे त्यांना खरेदी करण्यासाठी सर्व टीममध्ये चढाओढ असेल.
मर्क्युरी खेळाडूंची यादी
सेट 1 : ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, जॉस बटलर, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, मिचेल स्टार्क
सेट 2 : केएल राहुल, युजवेंद्र चहल, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मिलर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
IPL 2025 Mega Auction LIVE Updates : कोणत्या टीमकडं किती RTM शिल्लक
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) - 1
दिल्ली कॅपिटल्स (DC) - 2
गुजरात टायटन्स (GT) - 1
कोलकाता नाईट रायडर्स (KKR) - 00
लखनौ सुपर जायंट्स (LSG) - 1
मुंबई इंडियन्स (MI) - 1
पंजाब किंग्ज (PBKS) - 4
राजस्थान रॉयल्स (RR) - 00
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) - 3
सनरायझर्स हैदराबाद (SRH) - 1
IPL 2025 Mega Auction LIVE Updates : कोणत्या टीमकडं किती रक्कम शिल्लक?
चेन्नई सुपर किंग्ज (CSK) - 55 कोटी
दिल्ली कॅपिटल्स (DC) - 73 कोटी
गुजरात टायटन्स (GT) - 69 कोटी
कोलकाता नाईट रायडर्स (KKR) - 51 कोटी
लखनौ सुपर जायंट्स (LSG) - 69 कोटी
मुंबई इंडियन्स (MI) - 45 कोटी
पंजाब किंग्ज (PBKS) - 110.50 कोटी
राजस्थान रॉयल्स (RR) - 41 कोटी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) - 83 कोटी
सनरायझर्स हैदराबाद (SRH) - 45 कोटी