MS Dhoni : धोनी 9 नंबरवर बॅटिंगला का आला? CSK च्या कोचनं सांगितलं खरं कारण

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

MS Dhoni's Batting Position : आयपीएल 2025 च्या पहिल्या आठवड्यात महेंद्रसिंह धोनीचा बॅटिंग ऑर्डरमधील क्रमांक चांगलाच चर्चेत आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु (CSK vs RCB) यांच्यातील झालेल्या मॅचमध्ये धोनी नवव्या क्रमांकावर बॅटिंगला आला होता. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. सोशल मीडियावर देखील हा प्रश्न चर्चेचा मुद्दा बनला होता. ट्रोलर्सनंही धोनी आणि सीएसकेला या विषयावर लक्ष्य केलं होतं. आता सीएसकेचा हेड कोच स्टिफन फ्लेमिंग ( Stephen Fleming) यानं या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे कारण?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (CSK vs RR) यांच्यात रविवारी (30 मार्च) झालेल्या सामन्यात धोनी सातव्या क्रमांकावर बॅटिंगला आला होता. धोनीला बॅटिंगमध्ये प्रमोशन दिल्यानंतरही सीएसकेला पराभव टाळता आला नाही. राजस्थाननं त्यांचा सहा रन्सनं पराभव केला.

या मॅचनंतर बोलताना फ्लेमिंगनं धोनीच्या बॅटिंग पोझिशनच्या कोड्याचं उत्तर दिलं आहे. फ्लेमिंग याबाबत बोलताना म्हणाला की, 'महेंद्रसिंह धोनी स्वत: त्याच्या बॅटिंगचा क्रमांक निश्चित करतो. त्याचं शरीर आणि गुडघे पहिल्यासारखे फिट नाहीत. तो व्यवस्थित हिंडू-फिरु शकतो. पण, आता त्रास जाणवत आहे. तो पूर्ण 10 ओव्हर्स बॅटिंग करण्यासाठी फिट नाही.

( नक्की वाचा : IPL 2025 : KKR चा 'हा' खेळाडू नेहमीच ठरलाय मुंबईसाठी काळ! आकडेवारी वाचून फुटेल घाम )

त्यामुळे धोनी परिस्थितीनुसार टीमसाठी काय करता येईल याचा निर्णय घेतो. राजस्थान विरुद्धच्या मॅचमध्ये तो वरच्या क्रमांकावर बॅटिंगला आला. तसंच गरज असेल तर अन्य खेळाडूंना आधी बॅटिंग करण्याची संधी देतो. 

Advertisement

धोनी आता 43 वर्षांचा आहे. तो गेल्या सिझनपासूनच बॅटिंग कमी करत आहे. धोनीनं 13 किंवा 14 व्या ओव्हरनंतर बॅटिंगला यावं असं टीम त्याला सांगते,  पण, धोनी मॅचच्या परिस्थितीनुसार बॅटिंगला येण्याचा निर्णय घेतो, असं फ्लेमिंगनं स्पष्ट केलं.

फ्लेमिंग पुढे म्हणाला की, 'मी मागच्या वर्षीच सांगितलं होतं की, तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. तो एक लीडर आहे. विकेटकिंपिंगसाठी त्याचं योगदान महत्त्वाचं आहे. तो क्वचितच नवव्या किंवा दहाव्या ओव्हरमध्ये बॅटिंगला आला असेल, असं फ्लेमिंगनं सांगितलं. 
 

Advertisement
Topics mentioned in this article