जाहिरात

IPL 2025 : KKR चा 'हा' खेळाडू नेहमीच ठरलाय मुंबईसाठी काळ! आकडेवारी वाचून फुटेल घाम

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders : कोलकाता नाईट रायडर्सच्या या खेळाडूची मुंबई इंडियन्स विरुद्धची आकडेवारी पाहून मुंबईच्या फॅन्सची झोप उडणार आहे.

IPL 2025 : KKR चा 'हा' खेळाडू नेहमीच ठरलाय मुंबईसाठी काळ! आकडेवारी वाचून फुटेल घाम
मुंबई:

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders : आयपीएल 2025 मधील 12 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (MI vs KKR) यांच्यात होणार आहे. मुंबई इंडियन्सची या सिझनची सुरुवात निराशाजनक झाली आहे. हार्दिक पांड्याच्या टीमनं पहिले दोन्ही सामने गमावले असून पॉईंट टेबलमध्ये ते शेवटच्या नंबरवर आहेत. आता घरच्या मैदानावर होणाऱ्या पहिल्या मॅचमध्ये पराभवाची साखळी तोडण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल.

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आजवर 34 सामने झाले आहेत. त्यापैकी 23 सामन्यात मुंबई इंडियन्सनं विजय मिळवलाय. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या 11 सामन्यातही मुंबईचं पारडं 9-2 असं जड आहे. पण दोन्ही टीममधील शेवटच्या सहापैकी पाच सामने कोलकाता नाईट रायडर्सनं जिंकले आहेत. त्यामुळे गतविजेत्या केकेआरला कमी लेखण्याची चूक मुंबई इंडियन्स करणार नाही. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

KKR चा खेळाडू ठरतोय काळ?

मुंबईकर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) च्या कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्समध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. पण, त्यापैकी एका खेळाडूपासून मुंबई इंडियन्सला विशेष सावध राहावं लागणार आहे. तो खेळाडू आहे व्यंकटेश अय्यर.

आयपीएल 2025 च्या लिलावात 23 कोटी 75 लाख रुपयांची बोली लावून केकेआरनं पुन्हा एकदा व्यंकटेश अय्यरला आपल्याकडंच ठेवलं. व्यंकटेशची बॅट मुंबई इंडियन्स विरुद्ध नेहमीच चालली आहे. व्यंकटेशनं मुंबई इंडियन्सविरुद्ध 72 च्या सरासरीनं 362 रन्स केले आहेत. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट आहे तब्बल 362. 

( नक्की वाचा :  MI vs GT: सलग दुसऱ्या सामन्यात मुंबईचा पराभव, गुजरातचा विजय )

व्यंकटेशनं मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सहा इनिंगमध्ये एक सेंच्युरी आणि तीन हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. त्याचबरोबर तो दोन वेळा चाळीस ते पन्नास रन्सच्या टप्प्यात आऊट झालाय. त्याचा मुंबई इंडियन्स विरुद्धचा निचांकी स्कोअर आहे 42. व्यंकटेशनं मुंबई विरुद्ध आत्तापर्यंत  53(30), 50(41), 43 (24), 104(51), 70(52), 42(21) असे रन्स बनवले आहे. (कंसातील आकडेवारी ही त्यानं खेळलेल्या बॉल्सची संख्या आहे.)

वानखेडेवर कमबॅक करणार?

मुंबई इंडियन्सला केकेआरला पराभूत करायचं असेल तर व्यंकटेश अय्यरला लवकर आऊट करावं लागेल. वानखेडे स्टेडियमवरील मुंबईचा रेकॉर्डही चांगला आहे. मुंबई इंडियन्सची वानखेडेवरील विजयाची टक्केवारी 61 टक्के आहे. पण, 2021 पासून ही टक्केवारी 57 टक्के झाली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: