IPL 2025, Mumbai Indians : पाच वेळा आयपीएल विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) खराब सुरुवातीनंतर सूर गवसला आहे. हार्दिक पांड्याच्या टीमनं सलग पाच मॅच जिंकल्या आहेत. विजेतेपदाची प्रबळ दावेदार असलेल्या मुंबई इंडियन्सला धक्का बसला आहे. त्यांचा डावखुरा स्पिनर विघ्नेश पुथूर (Vignesh Puthur) या सिझनमधून दुखापतीमुळे आऊट झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबई इंडियन्सचा गुरुवारी (1 मे 2025) राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी फ्रँचायझीनं ही माहिती दिलीय. विघ्नेशच्या जागी रघू शर्मा या अनकॅप लेग स्पिनरचा टीममध्ये समावेश करण्यात आहे. त्याला 30 लाख रुपयांमध्ये करारबद्ध करण्यात आलंय.
विघ्नेशची दमदार कामगिरी
केरळाच्या विघ्नेशला स्थानिक स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं यंदाच्या ऑक्शनमध्ये खरेदी केले होते. त्याला आयपीएलपूर्वी सराव व्हावा म्हणून दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन MI या टीममध्ये नेट बॉलर म्हणून पाठवण्यात आले होते.
( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi :वडिलांनी जमीन विकली, बेरोजगार झाले, वैभव सूर्यवंशीला घडवण्यासाठी धडपडणाऱ्या बापाची गोष्ट!)
विघ्नेशनं आयपीएलमध्ये दमदार पदार्पण केलं. त्यानं चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या लढतीत ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा आणि शिवम दुबे या तीन प्रमुख बॅटर्सना आऊट केलं होते. विघ्नेशनं या सिझनमधील 5 सामन्यात 9.08 च्या इकोनॉमी रेटनं 6 विकेट्स घेतल्या होत्या.
कोण आहे रघू शर्मा?
मुंबई इंडियन्सनं विघ्नेशच्या जागी रघू शर्माचा समावेश केला आहे. रघूचा 11 मार्च 1993 रोजी जालंधरमध्ये जन्म झाला. तो उजव्या हातानं लेग स्पिन बॉलिंग करतो. त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाब आणि पुडुच्चेरी टीमचं प्रतिनिधित्व केलं आहे.
रघूनं 11 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 19.57 च्या सरासरीनं 57 विकेट्स घेतल्या आहेत. तर लिस्ट A क्रिकेटमधील 9 मॅचमध्ये 14 विकेट्स घेतल्यात. रघूनं 3 टी20 मॅच खेळल्या असून त्यामध्ये 3 विकेट्स घेतल्या आहेत.