
Vaibhav Suryavanshi Story : 14 वर्षांच्या वैभवकडं अजून मतदानाचा अधिकार नाही. स्वत:चं ड्रायव्हिंग लायसन्स नाही. पण, 35 बॉलमध्ये आयपीएल सेंच्युरीचा रेकॉर्ड आहे. या यादीत साक्षात ख्रिस गेलनंतर त्याचा क्रमांक आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आयपीएल 2025 मधील राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स (Rajasthan Royals vs Gujrat Titans) या मॅचमध्ये गुजरातच्या बॉलर्सची धुलाई केली. वैभवचा जन्मापूर्वीपासून इशांत शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय. इंशात शर्मा आणि मोहम्मद सिराज या दोघांना मिळून 141 टेस्ट मॅचचा अनुभव आहे. 14 वर्ष 32 दिवस वय असलेल्या वैभवनं T20 क्रिकेटमधील सर्वात खडतर लीगमध्ये या अनुभवी बॉलर्सना लक्ष्य केलं. इशांतला स्क्वेयर लेगवरुन आणि सिराजच्या बॉलिंगवर लाँग ऑनवरुन त्यानं ज्या पद्धतीनं फटकेबाजी केली त्यावरुन त्याचा क्लास सिद्ध झाला.
( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi : लक्ष्मणनं पुसले डोळे...द्रविडनं दिले धडे, 2 महान खेळाडूंनी कसा घडवला छोटा चॅम्पियन? )
बाप आणि मुलानं केला संघर्ष
आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर 3 वर्षांनी वैभवचा जन्म झाला. बिहारमधील समस्तीपूर हे वैभवचं गाव. त्याला त्याचे वडिल संजीव सूर्यवंशी यांनीच क्रिकेटच्या मैदानावर आणलं. संजीव यांचंही क्रिकेटर होण्याचं स्वप्न होतं. परिस्थितीमुळे ते स्वप्न पूर्ण झालं नाही. पण, मुलाच्या मार्गात कोणताही अडथळा येऊ द्यायचा नाही, असा त्यांनी ठाम निश्चय केला होता.
पाचव्या वर्षापासूनच वैभवनं क्रिकेट शिकण्यास सुरुवात केली. त्याची क्रिकेटमधील प्रगती झपाट्यानं होत होती. त्यानंतर तो 10 वर्षांचा असताना त्याला पाटणामध्ये आठवड्यातून तीन दिवस क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी नेण्यास संजीव यांनी सुरुवात केली.
( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi : 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची 35 बॉलमध्ये सेंच्युरी! मोडले इतके सारे रेकॉर्ड्स... )
वैभवला क्रिकेटपटू घडवणं हेच त्याच्या वडिलांचं स्वप्न होतं. घरातील परिस्थिती बेताची. उत्पन्नाचे साधन देखील नगण्य होते.अखेर संजीव सूर्यवंशी यांनी स्वत:ची जमीन विकली. ते बेरोजगार झाले. त्यानंतरही त्यांनी वैभवच्या सरावात खंड पडू दिला नाही.
पटणामध्ये 10 व्या वर्षी नेट प्रॅक्टीस करताना इतर मुलं साधारण रोज 100 बॉल खेळत. वैभव रोज 600 बॉल खेळत असे. 16-17 नेट बॉलर्स त्याला बॉलिंग करत. या सर्वांसाठी रोज 10 टिफिन वैभवचे वडील घेऊन येत. वैभवची आई रोज पहाटे उठून हा सारा स्वयंपाक करत असे.
आई-वडिलांच्या या कष्टाचं चीज वैभवनं केलं. तो 13 व्या वर्षीच अंडर 19 आशिया कप स्पर्धेत भारताकडून खेळला. बिहारकडून रणजी स्पर्धेत खेळला. 14 व्या वर्षी आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा रेकॉर्ड त्यानं केला. त्यानंतर तिसऱ्याच सामन्यात अनेक मोठे विक्रम त्यानं मोडत क्रिकेट विश्वाला स्वत:ची दखल घ्यायला त्यानं भाग पाडलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world