MI vs GT : पावसाच्या अडथळ्यानंतर गुजरातचा मुंबई इंडियन्सवर थरारक विजय, पहिल्या क्रमांकावर मारली उडी

MI vs GT : मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना गुजरातसमोर विजयासाठी 156 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स (Mumbai Indians vs Gujrat Titans) या दोन फॉर्मातील टीममध्ये सामना मंगळवारी झाला. या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना गुजरातसमोर विजयासाठी 156 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

गुजरातची सुरुवात खराब झाली. या सिझनमध्ये सातत्यानं मोठी खेळी करणारा साई सुदर्शन (Sai Sudharsan ) पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 5 रन काढून आऊट झाला. ट्रेन्ट बोल्टनं त्याला आऊट केलं. 

Advertisement

साई सुदर्शन आऊट झाल्यानंतर शुबमन गिल (Shubman Gill) आणि जोस बटलर (Jos Buttler) यांनी गुजरातची इनिंग सावरली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 72 रनची भागिदारी केली. अश्वनी कुमारनं बटलरला (30) आऊट करत ही जोडी फोडली. बटलर बाद झाल्यानंतर पावसाच्या अडथळ्यामुळे काही काळ मॅच थांबवावी लागली.

Advertisement

( नक्की वाचा : India's Squad For England Tour : चांगल्या कामगिरीनंतरही बुमराहला बसणार धक्का, BCCI च्या मनात काय? )

पावसानंतर मॅच पुन्हा सुरु झाली त्यावेळी गुजरातनं 4 विकेट्स झटपट गमावल्या.  18 ओव्हरनंतर मॅच पावसामुळे पुन्हा थांबली त्यावेळी गुजरातला 12 बॉलमध्ये 24 रन्सची गरज होती. पाऊस थांबल्यानंतर  गुजरातला विजयासाठी 6 बॉलमध्ये 15 हे सुधारित लक्ष्य देण्यात आलं. राहुल तेवातिया आणि जेरॉल्ड कोएत्झीनं दीपक चहरच्या बॉलिंगचा चांगला समाचार घेत गुजरातला बरोबरीत आणलं. शेवटच्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर कोएत्झी आऊट झाला.त्यावेळी गुजरातला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 1 रन हवा होता. शेवटच्या बॉलवर अर्शद खाननं 1 रन काढत गुजरातला मॅच जिंकून दिली. गुजरातकडून शुबमन गिलनं सर्वात जास्त 43 रन केले. 

Advertisement
या विजयासह गुजरातचे 11 मॅचनंतर 16 पॉईंट्स झाले असून त्यांनी पॉईंट टेबलमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. तर मुंबई इंडियन्ससाठी आता उर्वरित दोन्ही सामने महत्त्वाचे असतील. 


मुंबईकडून जॅक्सची हाफ सेंच्युरी

त्यापूर्वी मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 आऊट 155 रन केले.  मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा या मॅचमध्ये अपयशी ठरला. तो फक्त 7 रन काढून आऊट झाला. 

( नक्की वाचा : IPL 2025 : रोहित शर्मा फिल्डिंग का करत नाही? मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदाच सांगितलं कारण )
 

मुंबई इंडियन्सकडून विल जॅक्स आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी 71 रनची पार्टनरशिप केली. सुर्यकुमार यादव 35 रन्सवर आऊट झाल्यानंतर मुंबईची इनिंग पुन्हा घसरली. मुंबई इंडियन्सकडून विल जॅक्सनं सर्वात जास्त 53 रन काढले. 

कोर्बिन बोशनं (Corbin Bosch) 27 रनचं योगदान दिलं. त्यामुळे त्यांना 150 रनचा टप्पा ओलांडता आला. गुजरातकडून साई किशोरनं सर्वात जास्त 2 विकेट्स घेतल्या. तर अन्य सर्व बॉलर्सनी प्रत्येकी 1 विकेट मिळवली. 

Topics mentioned in this article