जाहिरात

IPL 2025 : रोहित शर्मा फिल्डिंग का करत नाही? मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदाच सांगितलं कारण

Rohit Sharma : मुंबई इंडियन्सनं या सिझनमध्ये बहुतेक मॅचमध्ये इम्पॅक्ट सब म्हणून रोहित शर्माचा वापर केलाय.

IPL 2025 : रोहित शर्मा फिल्डिंग का करत नाही? मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदाच सांगितलं कारण
मुंबई:

Rohit Shrama News : आयपीएल 2025 चा सिझन सध्या चांगलीच रंगतदार अवस्थेत आहे. या सिझनमध्ये प्ले ऑफ गाठण्यासाठी 7 टीममध्ये सध्या जोरदार चुरस आहे. पाचवेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians ) खराब सुरुवातीनंतर दमदार कामगिरी केलीय. मुंबई इंडियन्सनं सलग 6 सामने जिंकले असून 'प्ले ऑफ' साठी त्यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. मुंबई इंडियन्सची कामगिरी दमदार होत असली तर माजी कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) फिल्डिंग का करत नाही? हा प्रश्न क्रिकेट फॅन्सना सतावतोय.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मुंबई इंडियन्सनं या सिझनमध्ये बहुतेक मॅचमध्ये इम्पॅक्ट सब म्हणून रोहित शर्माचा वापर केलाय. त्यानुसार रोहित शर्मा फक्त बॅटिंग करतो. वास्तविक पाच वेळा मुंबई इंडियन्सला विजेतेपद जिंकून देणाऱ्य़ा टीमचा रोहित शर्मा कॅप्टन होता. त्याच्या अनुभवाचा हार्दिकला फिल्डिंगच्या दरम्यान उपयोग होऊ शकतो. त्यानंतरही रोहित फिल्डिंग का करत नाही? या प्रश्नाचं उत्तर मुंबई इंडियन्सचा हेड कोच महेला जयवर्धनेनं दिलं आहे.

( नक्की वाचा : Mumbai Indians : तळाची मुंबई इंडियन्स टॉपला कशी पोहोचली? वाचा विजयी सिक्सर्सचे 6 प्रमुख कारणं )
 

काय आहे कारण?

महेला जयवर्धनेनं या विषयावर बोलताना सांगितलं की, रोहित शर्माला 'इम्पॅक्ट सब' म्हणून खेळवण्याचा निर्णय पू्र्वीपासून घेण्यात आला नव्हता. बॉलिंगप्रमाणे फिल्डिंगमध्येही उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची टीमला गरज आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. 

रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दरम्यान किरकोळ दुखापत झाली होती. ही दुखापत वाढू नये अशी आमची इच्छा आहे. या सिझनच्या सुरुवातीला तशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे रोहित सुरुवातीला काही मॅचमध्ये फिल्डिंगसाठी उतरला होता.

( नक्की वाचा : India's Squad For England Tour : रोहित शर्माचं भवितव्य ठरलं! फॉर्मातील 2 खेळाडूंना जागा नाही? )

जयवर्धने पुढे म्हणाला की, तुम्ही टीमची रचना पाहिली तर बहुतेक खेळाडू दुहेरी भूमिका बजावत आहेत. काही फास्ट बॉलर बाऊंड्रीच्या जवळ फिल्डिंग करतात. तुम्हाला फिल्डिंगसाठी जोरानं पळू शकतील अशा खेळाडूंची गरज आहे. रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दरम्यान किरकोळ दुखापतग्रस्त झाला होता. ती दुखापत वाढू नये अशी आमची इच्छा आहे. आमच्यासाठी रोहितची बॅटिंग महत्त्वाची असल्याचं जयवर्धनेनं स्पष्ट केलं.

रोहितची महत्त्वाची भूमिका

रोहितनं नेहमीच मैदानात आणि मैदानाच्या बाहेर टीमसाठी महत्त्वाचं योगदान दिलं आहे, असं जयवर्धनेनं यावेळी सांगितलं. तो नेहमीच डग आऊटमध्ये उपस्थित असतो. टाईम आऊटच्या दरम्यान मैदानात जाऊन खेळाडूंना सूचना देतो. तो टीममध्ये सक्रीय आहे, असं जयवर्धनेनं सांगितलं.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: