IPL 2025 Retention : रोहित शर्माबाबत संभ्रम कायम, MI 'या' 4 जणांना नक्की रिटेन करणार?

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

आयपीएल 2025 साठी खेळाडूंना रिटेन करण्याबाबतची डेडलाईन संपण्यास आता काही तास शिल्लक आहेत. बीसीसीआयनं सर्व 10 आयपीएल फ्रँचायझींना रिटेन करण्यात येणाऱ्या खेळाडूंची यादी 31 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई इंडियन्स काय करणार?

आयपीएल 2025 च्या रिटेन्शनच्या नियमानुसार कोणतीही टीम जास्तीत जास्त 6 खेळाडूंना रिटेन करु शकते. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले (भारतीय आणि विदेशी) मिळून जास्तीत जास्त 5 खेळाडू रिटेन करण्यास परवानगी आहे. तर फक्त फर्स्ट क्लास क्रिकेटचा अनुभव असलेल्या जास्तीत जास्त दोन खेळाडूंनाच रिटेन करता येणार आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मुंबई इंडियन्सही आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीमपैकी एक आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांनी प्रत्येकी पाच वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. पण मागील तीन वर्षांचा टप्पा मुंबई इंडियन्ससाठी निराशाजनक ठरला. या कालावधीमध्ये त्यांना एकदाही विजेतेपद मिळवता आलं नाही.

मागील सिझनमध्ये मुंबई इंडियन्सनं गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्याला करारबद्ध करत थेट टीमचा कॅप्टन केलं. टीम मॅनेजमेंटचा हा निर्णय मुंबईच्या फॅन्सना आवडला नाही. त्यांनी भर मैदानात हार्दिकचं ट्रोलिंग केलं. त्यातच टीमनंही खराब कामगिरी करत फॅन्सना निराश केलं. मुंबई इंडियन्सनं मागील सिझनमध्ये सर्वात शेवटचा क्रमांक पटकावला होता.

Advertisement

( नक्की वाचा : IPL 2025 : KL राहुलचं भवितव्य ठरलं! झहीर खाननं सादर केला खळबळजनक रिपोर्ट )

रोहितबाबत संभ्रम

मागील सिझनमधील अनुभवानंतर रोहित शर्मा 2025 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणार का?  हा प्रश्न विचारण्यात येत होता. काही आयपीएल फ्रँचायझी रोहितला लिलावात विकत घेऊन कॅप्टन करण्यास उत्सुक असल्याचीही क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.

Advertisement

आयपीएल रिटेन्शन जाहीर होण्यास काही तास शिल्लक असताना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रोहित शर्माला आगमी मेगा ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्स रिटेन करण्याची दाट शक्यता आहे. रोहित शर्माबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. पण, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या चार खेळाडूंना रिटेन करण्याचा निर्णय मुंबई इंडियन्सनं घेतला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.