आयपीएल 2025 पूर्वी होणाऱ्या मेगा ऑक्शनचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. आगामी सिझनपूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलनं खेळाडूंच्या रिटेन्शनचे नियमही जाहीर केले आहेत. त्यामुळे प्रत्येक टीम कामाला लागली आहे. ऑक्शनपूर्वी कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार तसंच कुणाला राईट टू मॅच (RTM) यावर खलबतं सुरु आहेत. लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन केएल राहुलचं भवितव्य काय असेल याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.
'टाईम्स ऑफ इंडिया' मधील वृत्तानुसार लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर झहीर खान आणि कोच जस्टीन लँगर यांनी टीमच्या कामगिरीमधील केएल राहुलच्या खेळाचं विश्लेषण केलं. त्यांनी राहुलच्या खेळाची आकडेवारी तपासली. त्यावेळी केएल राहुलनं जास्त बॉल खेळल्यानंतर टीमच्या पराभवाची शक्यता वाढत असल्याचं त्यांना आढळलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
झहीर खान आणि जस्टीन लँगरसह लखनौ सुपर जायंट्सच्या मॅनेजमेंटरनं आकडेवारीचं विश्लेषण केलं आहे. या विश्लेषणानुसार केएल राहुलनं ज्या मॅचमध्ये दीर्घकाळ बॅटिंग करुन रन्स काढले त्या बहुतेक मॅच टीमनं गमावल्याचं त्यांना आढळलं आहे. राहुलचा स्ट्राईक रेट मॅचच्या गतीची मेळ राखत नाही. इम्पॅक्ट प्लेयरच्या नियमामुळे एकूण धावसंख्येचं प्रमाण वाढलं आहे. त्या परिस्थितीमध्ये रन काढण्यासाठी अधिक वेळ घेणारा खेळाडू टॉप ऑर्डरमध्ये ठेवणे परवडणारे नाही, असा निष्कर्ष या समितीनं काढला आहे, अशी माहिती सूत्रांनी वृत्तपत्राला दिली आहे.
या वृत्तानुसार फास्ट बॉलर मयांक यादवला लखनौ सुपर जायंट्स रिटेन करणार हे नक्की झालं आहे. लखनौ रिटेन करणाऱ्या टॉप 3 खेळाडूंमध्ये त्याचं नाव असण्याची शक्यता आहे. मयांक यादव हा लखनौ सुपर जायंट्सचं फाईंड आहे. कुणाबद्दलही त्याला माहिती नव्हतं त्याकाळात लखनौनं त्याच्यावर गुंतवणूक केली आहे. त्याचबरोबर त्यानं मॅचवर इम्पॅक्ट टाकण्याची क्षमता देखील सिद्ध केली आहे, असं या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलंय.
( नक्की वाचा : 'भारतीय क्रिकेटपटूचे वडील घेत होते धर्मांतराचे कार्यक्रम', क्लबनं केली खेळाडूवर कारवाई )
आजवर एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेले ( uncapped players) आयुष बदोनी आणि मोहसीन खान यांनाही फ्रँचायझीकडून रिटेन केलं जाण्याची शक्यता आहे.
टीम इंडियाचा विकेट किपर बॅटर ऋषभ पंतचा कर्णधारपदासाठी लखनौ सुपर जायंट्सकडून विचार केला जातोय. दिल्ली कॅपिटल्सनं त्याला मुक्त केलं तर लखनौ त्याला खरेदी करण्यात रस दाखवू शकते, अशी माहिती या रिपोर्टमध्ये देण्यात आलीय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world