Vaibhav Suryavanshi : 500 मिस कॉल, 4 दिवस फोन बंद, 'गुरु द्रविड' समोर वैभव सुर्यवंशीनं दिली कबुली

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Vaibhav Suryavanshi interview with Rahul Dravid:  राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) 14 वर्षांचा बॅटर वैभव सूर्यवंशीसाठी हा आयपीएल सिझन (IPL 2025) स्वप्नवत ठरला. त्यानं या सिझनमध्ये 252 रन्स केले. तसेच आयपीएलमध्ये सर्वात वेगवान सेंच्युरी करणारा तो भारतीय ठरला. या आयपीएल सिझनमुळे वैभव स्टार बनला आहे. वैभवनं सिझनचा शेवट देखील हाफ सेंच्युरीसह केला. त्यानं चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 57 रन्सची खेळी करत टीमच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

या मॅचनंतर राजस्थान रॉयल्सचा हेड कोच राहुल द्रविडने वैभवची मुलाखत घेतली (Rahul Dravid Interview with Vaibhav Suryavanshi). या मुलाखतीदरम्यान वैभवनं आयपीएलमध्ये  पहिली सेंच्युरी (Vaibhav Suryavanshi in IPL 2025) झळकाववल्यानंतर काय  घडले ते सांगितले.

500 पेक्षा जास्त मिस कॉल

वैभव म्हणाला की, त्यावेळी मला खूप कॉल येत होते. 500 पेक्षा जास्त मिस कॉल होते. लोक माझ्याशी बोलू इच्छित होते, पण मी चार दिवस माझा फोन बंद ठेवला होता. चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवल्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडशी बोलताना वैभवनं सांगितले की, त्याच्या पहिल्या सेंच्युरीनंतर लोक त्याला कॉल करून अभिनंदन करत होते. 

( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi :वडिलांनी जमीन विकली, बेरोजगार झाले, वैभव सूर्यवंशीला घडवण्यासाठी धडपडणाऱ्या बापाची गोष्ट! )
 

वैभव म्हणाला, 'पहिल्या सेंच्युरीनंतर किती तरी लोकांनी त्याला कॉल आणि मेसेज केले, 500 पेक्षा जास्त मिस कॉल होते, पण मी फोन बंद केला आहे. मला या सगळ्या गोष्टींमध्ये काहीही रस नाही. मी तुम्हाला हे सांगितलेही होते. आयपीएल सेंच्युरीनंतर अनेक लोकांनी माझ्याशी संपर्क साधला, पण मला ते जास्त आवडले नाही. मी 2-4 दिवसांसाठी आपला फोन बंद ठेवला. मला जास्त लोकांचे आजूबाजूला असणे आवडत नाही. फक्त माझे कुटुंब आणि काही मित्र, एवढेच पुरेसे आहे.

Advertisement

द्रविडनं दिला खास सल्ला

राहुल द्रविडनं या मुलाखतीच्या दरम्यान वैभवला खास सल्ला दिला. त्यानं वैभवला सांगितलं की, 'पुढील सिझनमध्ये तुला आणखी चांगली कामगिरी करायची आहे. सर्व बॉलर्स तुझ्याविरुद्ध नवीन रणनीती घेऊन येतील. त्यांनी तुला या सिझनमध्ये पाहिले आहे. पुढील सिझनमध्ये ते तुला लवकरात लवकर आऊट करण्याचा प्रयत्न करतील. तुला आत्तापासूनच पुढील तयारी करायची आहे

अंडर-19 टीममध्ये खेळणार वैभव
वैभवने राहुल द्रविडसोबतच्या मुलाखतीत पुढे हे देखील सांगितले की, आता तो अंडर-19 टीममध्ये खेळायला जाणार आहे. अंडर-१९ चा कॅम्प देखील लागणार आहे, मला आता तिथे जायचे आहे. या मुलाखतीत वैभव सूर्यवंशीने राजस्थान रॉयल्सचे (Rajasthan Royals coach) प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे आभार मानले.

Advertisement
Topics mentioned in this article