Who is Malvika Nayak? : आयपीएल 2025 मधील जवळपास प्रत्येक मॅचमध्ये अनुष्का शर्मा (Anushka Sharma) तिचा नवरा विराट कोहलीला (Virat Kohli) प्रोत्साहन देताना दिसली आहे. मात्र, ती स्टँड्समध्ये एकटी नसते. ती नेहमी एका महिलेसोबत असते ही महिला देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ही महिला कोण आहे? ती अनुष्का शर्माच्या शेजारी का बसते? हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर आम्ही देणार आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, अनुष्का शर्माच्या शेजारी दिसणारी महिला दुसरी कोणी नसून तिची खास मैत्रीण मालविका नायक आहे. अनुष्का आणि मालविकाची मैत्री खूप घट्ट आहे. त्या दोघी अनेकदा एकत्र सामने पाहण्यासाठी जातात. एवढेच नाही, तर मालविकाला विराट आणि अनुष्कासोबत इतर ठिकाणीही अनेकदा पाहण्यात आलं आहे.
अलीकडेच लीग टप्प्यातील शेवटच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सची (LSG) रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) सोबत लढत झाली होती. त्यावेळी LSG कडून खेळताना ऋषभ पंतनं सेंच्युरी झळकावली होती. त्यानंतर पंतनं मैदानात जोरदार सेलिब्रेशन केलं. यावर मालविकाची प्रतिक्रिया खूप व्हायरल झाली होती. पंतच्या सेलिब्रेशनवर ती फारशी खूश दिसली नव्हती.
( नक्की वाचा : IPL 2025: मुंबई इंडियन्स यंदा राहणार ट्रॉफीपासून दूर, 'हा' विचित्र योग आहे कारण! )
मालविका नायक कोण आहेत?
तिच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार मालविका नायक मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशनमधून एमबीए पदवीधर आहे. सध्या ती इनोज टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट आणि पार्टनरशिपचे काम सांभाळत आहे.
मलविकाचे लग्न निखिल सोसलेसोबत झाले आहे, जो डियाजियो इंडियामध्ये मार्केटिंग आणि रेव्हेन्यू प्रमुख म्हणून कार्यरत आहे.