IPL 2026 Auction: ऑक्शन टेबलवर धमाका ! पाहा आयपीएल 2026 साठी 4 सर्वात महागडे खेळाडू कोण असणार?

IPL 2026 Auction Most Expensive Players: अबू धाबीमध्ये मंगळवारी (16 डिसेंबर) होणाऱ्या मिनी ऑक्शमध्ये काही खेळाडूंवर सर्वाधिक बोली लागण्याची शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
IPL 2026 Auction Update : कॅमेरुन ग्रीन मिनी ऑक्शनचा केंद्रबिंदू असेल.
मुंबई:

IPL 2026 Auction Most Expensive Players: आयपीएल 2026 साठी प्रत्येक टीमला त्यांच्याती मुख्य कमतरता (Key Gaps) भरुन काढायची आहे. त्यासाठी अबू धाबीमध्ये मंगळवारी (16 डिसेंबर) होणाऱ्या मिनी ऑक्शमध्ये काही खेळाडूंवर सर्वाधिक बोली लागण्याची शक्यता आहे.  आगामी ऑक्शमध्ये सर्वाधिक मागणी असणारे 4 प्रमुख खेळाडू कोण ते पाहूया

कॅमेरून ग्रीन (Cameron Green)

सेट 1: बॅटर. बेस प्राईस: 2 कोटी

आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सनं  आगामी काळातील मोठी गुंतवणूक म्हणून कॅमेरुन ग्रीनला तब्बल 17.5 कोटींना खरेदी केले होते. पण, नंतर फक्त वर्षभरातच त्यांनी ग्रीनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे (RCB) ट्रेड केले. पण या ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडरने त्याच्या पहिल्या आयपीएल सीझनमध्ये त्याचे बॅटिंगमधील कौशल्य सिद्ध केले होते. ग्रीननं ओपनरसह वेगवेगळ्या पोझिशनमध्ये खेळत 160.28 च्या सरासरीनं आणि 50.22 च्या सरासरीसह 452 रन्स केले होते.

आरसीबीकडून खेळताना ग्रीनने 13 मॅचेसमध्ये 31.87 च्या ॲव्हरेजने आणि 143.25 च्या स्ट्राइक रेटने 255 रन केले. त्याने आरसीबीसाठी 8.61 च्या इकॉनॉमीने 10 विकेट्सही घेतल्या होत्या. ग्रीन दुखापतीमुळे मागील आयपीएल ऑक्शनमध्ये नव्हता. पण आता एका वर्षानंतर तो या मिनी ऑक्शनचा केंद्रबिंदू असेल.

सर्वाधिक पर्स (Purse) असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) या दोन्ही टीम्सला एका तगड्या ओव्हरसीज ऑलराऊंडरची नितांत गरज आहे. ग्रीनने स्वतःची नोंदणी बॅटर म्हणून केली आहे, पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्या बॉलिंगवर कोणतेही बंधन घातले नसल्याची माहिती आहे. केकेआरला आयपीएलमधून निवृत्त झालेल्या आंद्रे रसेलचा सक्षम पर्याय हवा आहे, तर सीएसकेला त्यांच्या मिडल ऑर्डरला बळ देण्यासाठी विदेशी ऑलराऊंडरची गरज आहे.

Advertisement

( नक्की वाचा : IPL 2026 Auction : 170 च्या स्ट्राइक रेटचा बॅटर, जडेजाचा संभाव्य वारसदार! 5 Uncapped प्लेयर्सवर पैशांचा पाऊस ! )


लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone)

सेट 2 ऑलराऊंडर. बेस प्राईस: 2 कोटी

T20 क्रिकेटमध्ये जबरदस्त पॉवर हिटर्समध्ये लियाम लिव्हिंगस्टोनचा समावेश होते. यंदाच्या हंड्रेड स्पर्धेत त्यानं राशिद खानला 4, 6,6,6 4 लगावत बर्मिंगहॅम फिनिक्सला सहज विजय मिळवून दिला होता. लिव्हिंगस्टोन मागील सिझनमध्ये आरसीबीकडे होता. पण, आरसीबीनं त्याला यंदा रिलीज केले आहे.

लिव्हिंगस्टोन 2025 मधील T20 सामन्यात सातत्यपूप्ण कामगिरी केली आहे. त्यानं यावर्षी 35 इनिंग्जमध्ये 30 च्या सरासरीनं आणि 148.93 च्या स्ट्राईक रेटनं 840 रन्स केले आहेत. केकेआर आणि सीएसकेच नाही तर डेव्हिड मिलरचा वारसदार शोधणारी लखनौ सुपर जायंट्सच्या (LSG) ही तो रडारवर असेल.

Advertisement

( नक्की वाचा : IPL 2026 Auction : जडेजाला रिलीज केल्यानंतर CSK ची मोठी चाल; 'या' 5 तगड्या खेळाडूंना करणार लिलावात टार्गेट )

मथीशा पथिराना (Matheesha Pathirana)

सेट 4 फास्ट बॉलर. बेस प्राईज 2 कोटी

श्रीलंकेचा मथीशा पथिराना हा दूर्मीळ गटातील बॉलर आहे. तो त्याच्या खास शैलीत 150 किलोमीटर प्रति तास वेगानं अचूक यॉर्कर टाकू शकतो. तसंच चांगला बाऊन्स टाकण्याचीही त्याची क्षमता आहे. यापूर्वी सीएसकेचा महत्त्वाचा प्लेयर असलेल्या पथिरानानं महेंद्रसिंह धोनीलाही चांगलेच प्रभावित केले होते.

पथिरानाला गेल्या वर्षाभरात दुखापतींचा सामना करावा लागलाय. या दुखापतींचा परिणाम त्याच्या फिटनेस आणि फॉर्मवर झालाय. याच कारणामुळे त्याला या ऑक्शनपूर्वी सीएसकेनं रिलीज केले होते. पण,  कमी वय आणि मोठी गुणवत्ता ही त्याची जमेची बाजू आहे. सीएसके, केकेआर आणि पंजाब किंग्ज या टीम त्याला मोठी बोली लावण्याची शक्यता आहे.

Advertisement

रवी बिश्नोई (Ravi Bishnoi)

सेट 5 स्पिनर. बेस प्राईस: 2 कोटी

लखनौ सुपर जायंट्सने (LSG) रवी बिश्नोईला रिलीज केल्यावर अनेकांना आश्चर्य वाटले होते. त्यांनी त्याला 2022 मध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून बिश्नोईला सर्वात प्रथम खरेदी केले होते. आयपीएस 2025 च्या मेगा ऑक्शपूर्वी 11 कोटी रुपये देत रिटेन केले होते. पण, त्याची गेल्या सिझनमधील आकडेवारी खास नव्हती. त्याचबरोबर आयपीएल 2025 मध्ये दिग्विजय राठीच्या उदयानंतर त्याचा टीममधील प्रभाव कमी झाला.

तरीही, ऑक्शनमध्ये असलेल्या मोजक्या कॅप्ड भारतीय स्पिनर्सपैकी बिश्नोईकडे लक्ष वेधले जाण्याची शक्यता आहे, खासकरून राजस्थान रॉयल्स (RR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) रिस्टस्पिनरच्या शोधात आहेत. सीएसके देखील त्याच्याकडे एक पर्याय म्हणून पाहू शकते.
 

Topics mentioned in this article