जाहिरात

IPL 2026 Auction : 170 च्या स्ट्राइक रेटचा बॅटर, जडेजाचा संभाव्य वारसदार! 5 Uncapped प्लेयर्सवर पैशांचा पाऊस !

IPL 2026 Auctions Uncapped Indian Players : देशांतर्गत क्रिकेटमध्ये (Domestic Cricket) दमदार कामगिरी करणाऱ्या अशा 5 खेळाडूंवर सर्व टीम्सची नजर असणार आहे, जे या लिलावात मोठी बोली आकर्षित करू शकतात.

IPL 2026 Auction : 170 च्या स्ट्राइक रेटचा बॅटर, जडेजाचा संभाव्य वारसदार! 5 Uncapped प्लेयर्सवर पैशांचा पाऊस !
IPL 2026 Auction : बजेट कमी आणि रिकाम्या जागांची संख्या जास्त अशी बहुतेक टीम्सची परिस्थिती आहे.
मुंबई:

IPL 2026 Auctions Uncapped Indian Players to Watch out  : आयपीएल 2026 साठी होणाऱ्या मिनी ऑक्शनसाठी (Mini Auction) काही तास शिल्लक आहेत. या ऑक्शनमध्ये सर्वच टीम्सना मर्यादीत बजेटमध्ये वेगवेगळ्या प्रश्नांचं उत्तर शोधावं लागणार आहे. बजेट कमी आणि रिकाम्या जागांची संख्या जास्त अशी बहुतेक टीम्सची परिस्थिती आहे.  अशा परिस्थितीत, अनकॅप्ड (Uncapped) म्हणजेच भारतीय क्रिकेटमधील ज्या खेळाडूंनी अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेलं नाही, त्यांची मागणी नेहमीप्रमाणेच जास्त असणार आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये (Domestic Cricket) दमदार कामगिरी करणाऱ्या अशा 5 खेळाडूंवर सर्व टीम्सची नजर असणार आहे, जे या लिलावात मोठी बोली आकर्षित करू शकतात.

कार्तिक शर्मा (Kartik Sharma)

एक क्लीन स्ट्रायकर आणि लोअर-ऑर्डर फिनिशर म्हणून ओळख असलेल्या कार्तिक शर्माच्या मोठ्या सिक्स मारण्याच्या क्षमतेमुळे अनेक टीम्सना हवा असेल. फक्त 19 वर्षांचा असलेल्या कार्तिकला जेएसडब्ल्यूने (JSW) करारबद्ध केलंय. ही टीम नीरज चोप्रा या आपल्या गोल्डन बॉयच्या मॅनेजमेंटचंही काम करते. यावरुनच त्याच्या प्रतिभेचा अंदाज येतो. कार्तिनं 12 T20 मॅचेसमध्ये 164 च्या स्ट्राईक रेटनं 334 रन्स केले आहे. तसंच 28 सिक्स लगावले आहेत.  

त्याच्या पॉवर-हिटिंगच्या व्हिडिओनं केव्हिन पीटरसन (Kevin Pietersen) आणि आर अश्विनसारख्या (R Ashwin) दिग्गजांना प्रभावित केलं आहे. तो मुश्ताक अली स्पर्धेत राजस्थानसाठी ट्रम्प कार्ड होता. राजस्थाननं 7 पैकी 6 सामन्यात विजय मिळवत नॉक आऊटमध्ये प्रवेश केला. कार्तिकचं या विजयी कामगिरीत भरीव योगदान होतं.

( नक्की वाचा : फक्त 438 रुपयांमध्ये मिळतंय T20 वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान सामन्याचं तिकीट,'या' पद्धतीनं करा घरबसल्या बुक )

आकिब नबी (Auqib Nabi)

जम्मू-काश्मीरचा बॉलर आकिब नबी (नोंदणीकृत नाव: Auqib Dar) हा गेल्या काही सीझन्सपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये सातत्याने विकेट्स घेणारा बॉलर आहे. त्याची मुख्य ओळख स्विंग बॉलर अशी आहे, पण त्याने त्याच्या खेळात  मोठी सुधारणा केली आहे. विशेषतः डेथ ओव्हर्समध्ये तो अधिक प्रभावशाली होतोय. याच कारणामुळे त्याचे मूल्य (Value) वाढले आहे.  

नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy) दिसली. त्याने 7 मॅचेसमध्ये 15 विकेट्स घेतल्या. या स्पर्धेत त्याचा इकोनॉमी रेट 8 पेक्षाही कमी होता. अकिब यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) या टीमचा नेट बॉलर होता. आगामी ऑक्शनमध्ये त्याच्यावर या टीम्सही अन्य टीमही जोरदार बोली लावू शकतात.  

प्रशांत वीर (Prashant Veer)

यूपी T20 लीगमध्ये (UP T20 Leauge) नोएडा सुपर किंग्सकडून (Noida Super Kings) खेळणाऱ्या प्रशांत वीरचीही चांगलीच चर्चा आहे. प्रशांत हा 20 वर्षांचा लेफ्ट आर्म स्पिनर ऑलराऊंडर आहे. आयपीएल टीममध्ये ऑल राऊंडर्सचं महत्त्व मोठं आहे. यंदाच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्यानं लक्षणीय कामगिरी केलीय.

प्रशांतनं या कामगिरीनं पाचवेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचं (CSK) लक्ष वेधलं आहे. सीएसकेला रविंद्र जडेजाचा (Ravindra Jadeja) वारस हवा आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचा फोकस प्रशांतवर केंद्रीत केला आहे. त्यासाठी त्यांनी प्रशांतला ट्रायलसाठही बोलवावलं होतं.

प्रशांत  मुश्ताक अली ट्रॉफी आणि उत्तर प्रदेश अंडर 23 स्पर्धेत 7 दिवसांमध्ये 6 सामने खेळला आहे. या T20 स्पर्धेत त्यानं 170 च्या इकोनॉमी रेटनं 112 रन्स केले. तसंच 7.76 च्या इकोनॉमी रेटनं 9 विकेट्स घेतल्या. या कामगिरीमुळेच तो नोएडा सुपर किंग्सप्रमाणे आणखी एका 'सुपर किंग्स'कडून खेळताना लवकरच दिसू शकतो.

( नक्की वाचा : IPL 2026 Auction : जडेजाला रिलीज केल्यानंतर CSK ची मोठी चाल; 'या' 5 तगड्या खेळाडूंना करणार लिलावात टार्गेट )

अशोक शर्मा (Ashok Sharma)

राजस्थानचा बॉलर अशोक शर्माची सातत्याने 140 किमी प्रति तासपेक्षा जास्त वेगाने बॉलिंग करण्याची क्षमता आहे. गेल्या दोन सिझनमध्ये त्याची बॉलिंग चांगलीच सुधारली आहे.  तो आता तिन्ही टप्प्यांमध्ये (Powerplay, Middle Overs, Death Overs) प्रभावीपणे बॉलिंग करणारा सीमर म्हणून उदयास आला आहे.

नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या ग्रुप स्टेजमध्ये त्याने सर्वाधिक 19 विकेट्स घेतल्या, 7 मॅचेसमध्ये त्यानं 12.20 ची सरासरी आणि 8.84 च्या इकोनॉमी रेटनं ही कामगिरी केली. अशोकनं यापूर्वी KKR आणि नंतर राजस्थान रॉयल्स (RR) च्या टीम्समध्ये स्थान मिळवलं होतं, पण त्याला एकही मॅच खेळायला मिळाली नाही. मात्र, या वेळी लिलावात त्याला संधी मिळेल, अशी प्रबळ शक्यता आहे.

करण फुलेत्रा (Karan Fuletra)

लेफ्ट-आर्म रिस्ट स्पिनर्स (Left-arm Wristspinners) जगभर दुर्मिळ आहेत, आणि नेमक्या याच कारणामुळे करण फुलेत्राने लक्ष वेधून घेतलं आहे. सौराष्ट्रकडून त्याने फक्त 2 T20 मॅचेस खेळल्या असल्या तरी त्याची चर्चा आहे.

फुलेत्राला मागच्या सीझनमध्ये सनरायझर्स हैदराबादने (SRH) नेट बॉलर म्हणून निवडलं होतं. काही तांत्रिक कारणामुळे, ॲडम झाम्पाच्या जागी बदली खेळाडू म्हणून त्याचा टीममध्ये समावेश होऊ शकला नाही, कारण त्याने लिलावासाठी नोंदणी केली नव्हती. त्याआधीच सौराष्ट्रचा कॅप्टन जयदेव उनाडकटने (Jaydev Unadkat) त्याचे नाव फ्रँचायझीला सुचवले होते. आता तो किमान दोन आयपीएल टीम्सच्या रडारवर आहे, असं वृत्त 'क्रिकइन्फो' नं दिलं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com