IPL 2026 Auction :आयपीएल 2026 च्या लिलावात मुंबईचा तडाखेबंद बॅटर सरफराज खान याच्या नशिबाने अखेर कलाटणी मिळाली. तब्बल दोन वर्ष लिलावात दुर्लक्षित राहिल्यानंतर, यंदा चेन्नई सुपर किंग्सने (CSK) त्याला खरेदी केले. सरफराजच्या या पुनरागमनावर त्याची जवळची मैत्रीण आणि माजी भारतीय क्रिकेटर संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर हिने सोशल मीडियावर दिलेली प्रतिक्रिया सध्या चांगलीच चर्चेत आहे.
अनाया बांगरची खास प्रतिक्रिया
अबू धाबी येथे झालेल्या लिलावात जेव्हा चेन्नईने सरफराज खानला त्याच्या 75 लाख रुपये या बेस प्राईजवर खरेदी केले, तेव्हा अनायाचा आनंद गगनात मावेनासा झाला. चेन्नई सुपर किंग्सने सरफराजचे स्वागत करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टवर अनायाने टाळ्या आणि फायर इमोजी कमेंट करत आपला आनंद व्यक्त केला.
सरफराज आणि अनाया यांची मैत्री खूप जुनी आहे. अनायाने यापूर्वीच सोशल मीडियावर स्पष्ट केले होते की, मोबाईल हातात येण्याआधीपासूनच त्यांच्या हातात बॅट होती आणि ते तेव्हापासूनचे मित्र आहेत.
( नक्की वाचा : Prithvi Shaw :पृथ्वी शॉचं नशीब फक्त 6 मिनिटात बदललं, 'ती' प्रतिक्रिया वाचून फॅन्सही गहिवरले! )
सरफराजने मानले चेन्नईचे आभार
आयपीएल 2023 नंतर सरफराजला कोणत्याही टीमनं पसंती दिली नव्हती. सततच्या नकारांनंतर मिळालेल्या या संधीमुळे सरफराजही खूप भावूक झाला आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर करत लिहिले की, मला नवीन आयुष्य दिल्याबद्दल चेन्नई सुपर किंग्सचे खूप खूप आभार.
सरफराज सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. लिलावाच्या अवघ्या काही तास आधी त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अवघ्या 22 बॉलमध्ये 73 रनची तुफानी खेळी केली होती. या स्पर्धेत त्याने 6 डावात 64.00 च्या सरासरीने आणि 182.85 च्या स्ट्राईक रेटने 256 रन केले आहेत.
अनाया बांगरचा प्रवास
भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनाया ही सुद्धा एक ॲथलीट आहे. तिने सुरुवातीला आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत वयोगटातील क्रिकेट खेळले होते. गेल्या वर्षी अनायाने आपल्या लिंग बदलाच्या (Gender Transformation) प्रवासाबाबत सोशल मीडियावर माहिती दिली होती. पूर्वी तिचे नाव आर्यन होते, मात्र हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी आणि सर्जरीनंतर तिने अनाया म्हणून आपली नवीन ओळख जगाला करून दिली. या कठीण प्रवासात तिने क्रिकेटवरील आपले प्रेम कायम ठेवले आहे.
( नक्की वाचा : IPL Auction 2026 : वडील खासदार, मुलगा गाजवणार आयपीएलचं मैदान, निवड होताच झाले भावूक ! म्हणाले... )
जुन्या मैत्रीची सोशल मीडियावर चर्चा
आयपीएल 2025 दरम्यान अनाया सरफराजच्या घरी गेली होती. तिथे तिने सरफराज आणि त्याचे वडील नौशाद खान यांच्यासोबत वेळ घालवला होता. त्यावेळचे फोटो शेअर करताना तिने लिहिले होते की, आम्ही दोन-तीन वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर एकमेकांना भेटत आहोत. सरफराजचा धाकटा भाऊ मुशीर खान यालाही तिने या पोस्टमध्ये मिस करत असल्याचे म्हटले होते. आता सरफराजला आयपीएलमध्ये पुन्हा संधी मिळाल्याने बांगर कुटुंब आणि सरफराजचे चाहते सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत आहेत.