जाहिरात

Prithvi Shaw :पृथ्वी शॉचं नशीब फक्त 6 मिनिटात बदललं, 'ती' प्रतिक्रिया वाचून फॅन्सही गहिवरले!

Prithvi Shaw in IPL Auction 2026 :अबूधाबीमध्ये मंगळवारी (16 डिसेंबर) आयपीएल 2026 चे ऑक्शन पार पडले. हे ऑक्शन पृथ्वी शॉ साठी कमालीचे नाट्यमय ठरले.

Prithvi Shaw :पृथ्वी शॉचं नशीब फक्त 6 मिनिटात बदललं, 'ती' प्रतिक्रिया वाचून फॅन्सही गहिवरले!
Prithvi Shaw : पृथ्वी शॉ ची सोशल मीडियावरील प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आहे.
मुंबई:

Prithvi Shaw in IPL Auction 2026 :अबूधाबीमध्ये मंगळवारी (16 डिसेंबर) आयपीएल 2026 चे ऑक्शन पार पडले. हे ऑक्शन पृथ्वी शॉ साठी कमालीचे नाट्यमय ठरले. कधी पदरी निराशा तर कधी अनपेक्षित आनंद अशा हेलकाव्यांमधून त्याचा हा प्रवास झाला. दोन वेळा अनसोल्ड राहिल्यानंतर अखेर शेवटच्या फेरीत दिल्ली कॅपिटल्सनं त्याला खरेदी केलं.  ही बातमी समोर येताच पृथ्वीने सोशल मीडियावर व्यक्त केलेली भावना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्याने अतिशय भावूक होत घर परतल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

हार्टब्रेक इमोजी ते आनंदाची सेल्फी

लिलावाच्या सुरुवातीला पृथ्वी शॉ याला खरेदी करण्यासाठी कोणत्याही टीमनं रस दाखवला नव्हता. दोन वेळा नाव पुकारले जाऊनही कुणी बोली न लावल्याने पृथ्वी प्रचंड निराश झाला होता. त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर 'इट्स ओके' असे लिहित तुटलेल्या हृदयाचा म्हणजेच हार्टब्रेकचा इमोजी पोस्ट केला होता. 

( नक्की वाचा : IPL Auction 2026 : वडील खासदार, मुलगा गाजवणार आयपीएलचं मैदान, निवड होताच झाले भावूक ! म्हणाले... )

मात्र काही वेळातच चक्रे फिरली आणि दिल्ली कॅपिटल्सने त्याला 75 लाख रुपये या बेस प्राईजवर संघात घेतले. संघ मिळाल्याचे समजताच पृथ्वीने तातडीने ती जुनी स्टोरी डिलीट केली आणि अक्षर पटेलसोबतचा फोटो शेअर केला.

Latest and Breaking News on NDTV

घरी परतल्याची पृथ्वीची भावना

दिल्ली कॅपिटल्सने तिसऱ्या प्रयत्नात पृथ्वीला संधी दिल्यानंतर त्याने अक्षर पटेलसोबतचा फोटो पोस्ट करून त्याला हार्ट इमोजीसह कॅप्शन दिले. त्याने या पोस्टमध्ये 'बॅक टू फॅमिली' असे लिहिले आहे. यावरून त्याला दिल्लीच्या संघात पुन्हा गेल्याचा किती आनंद झाला आहे हे स्पष्ट दिसते. 

पृथ्वीने 2018 पासून आयपीएलमध्ये फक्त दिल्ली कॅपिटल्सचेच प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे इतर कोणत्याही संघाने रस न दाखवल्यानंतर आपल्या जुन्याच संघाने साथ दिल्याने तो कमालीचा भावूक झाला आहे.

(नक्की वाचा :  IPL Auction 2026 Update: आयपीएल ऑक्शनमध्ये कोणत्या टीमनं कोणता खेळाडू खरेदी केला? वाचा संपूर्ण यादी )

पृथ्वी शॉची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

पृथ्वीने ऑक्टोबर 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत भारतासाठी 5 टेस्ट आणि 6 वनडे सामने खेळले आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने 1 सेंच्युरी आणि 2 अर्धशतकांसह 339 रन केले आहेत, तर वनडेमध्ये त्याच्या नावावर 189 रन आहेत. पृथ्वी शॉ  25 जुलै 2021 रोजी आपला शेवटचा टी20 सामना खेळला होता, ज्यात तो खातेही उघडू शकला नव्हता. तेव्हापासून तो टीम इंडियामधून बाहेर आहे.

दिल्ली कॅपिटल्ससाठी पृथ्वीची कामगिरी

 पृथ्वीने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत 79 सामन्यात 23.94 च्या सरासरीने 1,892 रन केले आहेत. यामध्ये त्याने 14 हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. विशेषतः 2021 चा सीझन त्याच्यासाठी खूप चांगला राहिला होता, ज्यात त्याने 479 रन केले होते. आता आगामी सीझनमध्ये त्याला दिल्ली कॅपिटल्ससाठी पुन्हा एकदा आपली जुनी लय गवसणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 26 वर्षांच्या या बॅटरसाठी हा सीझन स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी असणार आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com