IPL 2026: आयपीएलमध्ये 'हनी-ट्रॅप'चे सावट? एका अघोषित गर्लफ्रेंडमुळे प्रकरण तापलं, BCCI ची थेट कारवाई

Honey Trap in Cricket : : काही अघोषित नात्यांमुळे आणि मैदानाबाहेरील वाढत्या हस्तक्षेपामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय आता कमालीचं सतर्क झालं आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
 Honey Trap in Cricket : बीसीसीआयला सर्वात मोठी भीती ही 'हनी ट्रॅप'ची वाटत आहे.
मुंबई:

विमल मोहन, प्रतिनिधी

 Honey Trap in Cricket : आयपीएलच्या झगमगत्या दुनियेत मैदानाबाहेर घडणाऱ्या घडामोडींनी आता एक वेगळंच वळण घेतलं आहे. ग्लॅमर आणि क्रिकेटच्या या मेळ्यात खेळाडूंच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी थेट बीसीसीआयच्या रडारवर आल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे रील्स आणि खेळाडूंच्या मैत्रिणींसोबतचे फोटो केवळ चर्चेचा विषय ठरले नाहीत, तर त्यातून सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः काही अघोषित नात्यांमुळे आणि मैदानाबाहेरील वाढत्या हस्तक्षेपामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय आता कमालीचं सतर्क झालं आहे.

काय आहे प्रकरण?

मैदानावर फोर आणि सिक्सचा वर्षाव करणारे धुरंधर खेळाडू सध्या त्यांच्या पार्टनरमुळे चर्चेत आहेत. हार्दिक पांड्या आणि माहिका, अर्शदीप सिंह आणि सिमरन कौर, यशस्वी जायसवाल आणि हॅमिल्टन यांची नावं सध्या सोशल मीडियावर जोरात गाजत आहेत. इतकंच नाही तर अनेक खेळाडू आपल्या महिला मित्रांसोबत प्रवास करताना किंवा हॉटेलमध्ये थांबताना दिसत आहेत. यामध्ये चिंतेची बाब अशी की, यातील काही जणी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत आणि त्या खेळाडूंच्या अगदी जवळच्या गराड्यात वावरताना दिसत आहेत. यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेला आणि शिस्तीला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

( नक्की वाचा : IPL मधील मुस्लीम खेळाडूकडून हिंदू प्रेयसीचे 'ब्रेनवॉशिंग'? कुराणातील आयती पाठ करण्याचा दबाब! वाचा सविस्तर )
 

BCCI ला कशाची भीती?

बीसीसीआयला सर्वात मोठी भीती ही 'हनी ट्रॅप'ची वाटत आहे. जेव्हा या तथाकथित गर्लफ्रेंड्स खेळाडूंच्या खोल्यांपासून ते अगदी प्रवासादरम्यान आणि मैदानाच्या आसपास मुक्तपणे वावरताना दिसल्या, तेव्हा बोर्डाच्या अधिकारी सावध झाले. 

Advertisement

काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अभिषेक त्रिपाठी यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. ज्यामध्ये युपीचा बॅटर समीर रिझवी आणि अँकर यसा सागर यांच्याबद्दलची चर्चा रंगली होती. अशा घटनांमुळे खेळाडूंच्या एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो आणि त्यांना चुकीच्या जाळ्यात ओढलं जाऊ शकतं, असं बोर्डाला वाटतंय.

( नक्की वाचा : Vinod Kambli: विनोद कांबळीच्या संघर्षाचा आईस्क्रीम कंपनीकडून सौदा? सोशल मीडियावर तीव्र संताप, काय आहे प्रकरण? )

काय आहे गाईडलाईन्स?

या सर्व प्रकाराला लगाम घालण्यासाठी बीसीसीआयने आता 7 पानांची एक अत्यंत कडक गाईडलाईन जारी केली आहे. यामध्ये हनी ट्रॅपचा धोका लक्षात घेऊन खेळाडूंसोबतच संघ मालकांवरही काही बंधनं घालण्यात आली आहेत. आता हॉटेलच्या खोल्यांमध्ये कधीही सरप्राईज चेकिंग केली जाऊ शकते. 

खेळाडूंच्या मॅनेजर्सना प्रत्येक हालचालीची नोंद ठेवावी लागणार आहे. इतकंच नाही तर परवानगीशिवाय कोणालाही खेळाडूच्या रूममध्ये एन्ट्री मिळणार नाही. सुरक्षेचं कडं आता पूर्वीपेक्षा जास्त घट्ट करण्यात आलं आहे.

 एखाद्या खेळाडूने हॉटेलच्या बाहेर पाऊल ठेवलं, तर त्याला प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यावा लागणार आहे. या नियमांचं उल्लंघन झाल्यास खेळाडूला मोठ्या दंडाला सामोरं जावं लागेल किंवा त्याचं निलंबनही होऊ शकतं. बीसीसीआय अशा प्रकरणांमध्ये कारणे दाखवा नोटीस बजावणे, आर्थिक दंड आकारणे किंवा थेट अयोग्य ठरवण्यापर्यंतचे कठोर निर्णय घेऊ शकते. तसेच डगआउटमध्ये मालकांच्या एन्ट्रीवरही आता काही मर्यादा आणल्या गेल्या आहेत.

कधी सुरु झालं प्रकरण?

या नियमांची मुळं गेल्या वर्षीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभवात आहेत. तेव्हा बीसीसीआयने खेळाडूंच्या पार्टनर आणि मुलांसाठी 14 दिवसांचा नियम लागू केला होता. पण आयपीएलमध्ये हे 'गर्लफ्रेंड कल्चर' आणि खेळाडूंची शिस्त बिघडत चालल्याचं चित्र दिसू लागल्याने बोर्डाला पुन्हा एकदा कडक पावलं उचलावी लागली आहेत. आयपीएलची जागतिक प्रतिमा आणि क्रिकेटचा दर्जा राखण्यासाठी ही शिस्त अत्यंत आवश्यक असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article