Love Jihad Allegations in IPL 2026: आयपीएल 2026 चा सिझन रंगात आलाय. सर्वच टीम प्ले ऑफमध्ये पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. मैदानातील फटकेबाजी तसंच बॉलर्सचे घातक स्पेल यामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन होत आहे. त्याचवेळी मैदानाबाहेर सोशल मीडियावर एक वाद सुरु झालाय. सोशल मीडियावरील एका पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झालीय. यात एका प्रसिद्ध क्रिकेटपटूवर 'लव्ह जिहाद'चा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचा एक मुस्लिम क्रिकेटपटू आणि एक हिंदू महिला स्पोर्ट्स अँकर यांच्यातील कथित संबंधांबाबत सुरू असलेल्या या चर्चेने आता गंभीर वळण घेतले आहे.
काय आहे प्रकरण?
वरिष्ठ पत्रकार अभिषेक त्रिपाठी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक सूचक पण स्फोटक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी कोणत्याही नावाचा थेट उल्लेख न करता काही धक्कादायक दावे केले होते.
त्रिपाठी यांच्या दाव्यानुसार, उत्तर प्रदेशातील हा क्रिकेटपटू त्याच्या हिंदू स्पोर्ट्स अँकर मैत्रिणीवर विशिष्ट धार्मिक नियम लादत आहे. नेटिझन्सनी या माहितीचा आधार घेत दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेटपटू समीर रिझवी आणि प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर येशा सागर यांच्याकडे निर्देश केला आहे.
( नक्की वाचा : Vinod Kambli: विनोद कांबळीच्या संघर्षाचा आईस्क्रीम कंपनीकडून सौदा? सोशल मीडियावर तीव्र संताप, काय आहे प्रकरण? )
कथित दबावाचे गंभीर आरोप
अभिषेक त्रिपाठी यांनी आपल्या पोस्टमध्ये काही धक्कादायक मुद्दे मांडले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, जेव्हा हा खेळाडू क्रिकेटच्या सरावासाठी बाहेर असतो, तेव्हा तो अँकरला कुराणमधील आयती (धार्मिक श्लोक) पाठ करायला सांगतो. इतकेच नाही तर, इतर खेळाडूंशी हस्तांदोलन करण्याऐवजी केवळ नमस्ते करून संवाद साधण्याच्या सूचनाही तिला देण्यात आल्याचे त्रिपाठी यांनी म्हटले आहे. या व्यतिरिक्त,
येशा सागरने तिच्या इंस्टाग्रामवरील सर्व बोल्ड आणि बिकिनीमधील फोटो डिलीट करावेत, असा दबावही तिच्यावर असल्याचे या ट्विटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
येशा सागरची पहिली प्रतिक्रिया
गेल्या 48 तासांपासून या विषयावर उलटसुलट चर्चा सुरू असताना, अखेर येशा सागरने शनिवारी 2 मे रोजी आपली चुप्पी तोडली आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आवाहन केले की, इंटरनेटवर दिसणाऱ्या किंवा वाचल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तिने ही चर्चा अफवा असल्याचे सुचवत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तिने धर्मांतराच्या किंवा दबावाच्या आरोपांवर सविस्तर भाष्य केले नसले तरी, तिची ही पोस्ट या सर्व प्रकरणाला उत्तर मानलं जात आहे.
पत्रकाराचा नवा इशारा
दरम्यान, अभिषेक त्रिपाठी यांनी येशाच्या प्रतिसादानंतर पुन्हा एकदा या प्रकरणात उडी घेतली आहे. त्यांनी समीर रिझवीला उद्देशून नवा इशारा दिला आहे. त्रिपाठी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे या प्रकरणाशी संबंधित 20 ओळींची माहिती आहे, ज्यापैकी त्यांनी केवळ 5 ओळी लिहिल्या आहेत. त्यांनी इशारा दिला की, त्यांना भाग पाडले तर ते एनसीएमधून दुखापतीचे खोटे कारण देऊन हॉटेलमध्ये एकत्र राहण्यापासून ते वयाची माहिती लपवण्यापर्यंतचे सर्व खुलासे करू शकतात.
समीर रिझवी आणि दिल्ली कॅपिटल्सची भूमिका
या संपूर्ण वादावर दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू समीर रिझवी याने अद्याप अधिकृतपणे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. तो सध्या आपल्या संघासोबत आयपीएलच्या मोहिमेत व्यस्त आहे. दिल्ली कॅपिटल्स या फ्रँचायझीने देखील या खेळाडूच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित प्रकरणापासून अंतर राखणे पसंत केले आहे. मात्र, या खळबळजनक आरोपांमुळे आयपीएलच्या चालू हंगामावर वादाचे सावट निर्माण झाले आहे.