IPL 2026, SRH vs PBKS : आयपीएल 2026 मध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात बुधवारी सामना झाला. यजमान सनरायझर्स हैदराबादनं हा सामना 33 रन्सनं जिंकला. या विजयासह सनरायझर्स हैदराबादचे आता 14 पॉईंट्स झाले आहेत. हैदराबादची टीम आता पॉईंट टेबलमध्ये थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. तसंच 'प्ले ऑफ' चं स्थान पक्क करण्यापासून फक्त एक विजय दूर आहे. हैदराबादचे अद्याप तीन सामने बाकी आहेत.
दुसरिकडे पंजाब किंग्जच्या पराभवाची मालिका सुरुच आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात धडाकेबाज खेळ करणाऱ्या पंजाबची वाटचाल सध्या चांगलची संथ झाली आहे. श्रेयस अय्यरच्या टीमचा या सिझनमधील हा सलग तिसरा पराभव आहे. आयपीएल 2026 मध्ये पंजाबवर पहिल्यांदाच ही वेळ आली आहे.या पराभवासह त्यांनी पहिला क्रमांकही गमावला आहे. पंजाबचे चार सामने बाकी आहेत. 'प्ले ऑफ'मध्ये पोहोचण्यासाठी त्यांना यामधील दोन सामने जिंकणे आवश्यक आहे.
कसा झाला सामना?
या सामन्यात पंजाब किंग्जचा कॅप्टन श्रेयस अय्यरनं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. अभिषेक अय्यर आणि ट्रॅव्हिस हेड या ओपनिंग जोडीनं हैदराबादला तडाखेबाज सुरुवात करुन दिली. अभिषेकनं 13 बॉलमध्ये 35 तर हेडनं 19 बॉलमध्ये 38 रन्स केले.
हे दोघं आऊट झाल्यानंतर इशान किशन (32 बॉल 55) आणि हेन्रिक क्लासेन (43 बॉल 69) यांनी हैदराबादचा रनरेट कमी होऊ दिला नाही. या दोघांनी हाफ सेंच्युरी झळकावली. त्या जोरावर हैदराबादनं निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 आऊट 234 रन्स केले.
( नक्की वाचा : Vinod Kambli: विनोद कांबळीच्या संघर्षाचा आईस्क्रीम कंपनीकडून सौदा? सोशल मीडियावर तीव्र संताप, काय आहे प्रकरण? )
पंजाबच्या टॉप ऑर्डरची निराशा
गुजरात टायटन्स प्रमाणेच या मॅचमध्येही पंजाबच्या टॉप ऑर्डरनं या मॅचमध्येही निराशा केली. प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्या आणि कॅप्टन श्रेयस अय्यर या टॉप ऑर्डरमधील तिघांना दोन अंकी रनही करता आले नाहीत. पंजाब किंग्जला पराभावाची चाहूल पहिल्या तीन ओव्हरमध्येच लागली होती.
कॉपर कॉनलीनं एकाकी लढत देत सेंच्युरी झळकावली. पण, त्याची ही खेळी पंजाबचा पराभव टाळू शकली नाही.