इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये पंजाब किंग्स संघाकडून चमकदार कामगिरी करून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अष्टपैलू क्रिकेटपटू शशांक सिंग आणि त्याचे वडील, निवृ्त्त आयपीएस (IPS) अधिकारी शैलेश सिंग यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. भोपाळच्या रातीबड पोलीस ठाण्यात या पिता-पुत्रासह त्यांच्या ड्रायव्हरवर एका घरगुती स्वयंपाक्याला खोलीत कोंडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी FIR दाखल करण्यात आला आहे. शशांकचे वडील शैलेश सिंग हे मध्य प्रदेश पोलिसांचे निवृत्त स्पेशल डीजीराहिलेले आहेत.
मोबाईल हिसकावल्याने वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विपेद्र सिंग तोमर असे पीडित तक्रारदाराचे नाव आहे. विपेद्रने 25 जून रोजी नीलबड परिसरातील सिंग यांच्या आलिशान बंगल्यावर स्वयंपाकी म्हणून काम सुरू केले होते. विपेद्र याला दरमहा 15000 रुपये पगार राहण्याची आणि खाण्याची मोफत सुविधा देण्याचे आश्वासन देऊन कामावर ठेवण्यात आले होते.
(नक्की वाचा- VIDEO: त्र्यंबकेश्वरमध्ये चमत्कार! अमृतकुंडातील लुप्त झालेल्या प्राचीन शिवलिंगाचे अचानक दर्शन)
कामात काहीतरी त्रुटी असल्याचे सांगत आरोपींनी विपेद्रचा मोबाईल फोन स्वतःकडे काढून घेतला होता. 28 जून रोजी सकाळी सर्वांचा नाश्ता बनवल्यानंतर विपेद्रने माजी आयपीएस अधिकारी शैलेश सिंग यांच्याकडे आपला मोबाईल परत मागितला. मात्र, त्यांनी फोन देण्यास स्पष्ट नकार दिला, ज्यामुळे हताश होऊन विपेद्र आपल्या खोलीत निघून गेला.
बेदम मारहाण करून घराबाहेर हाकलले
विपेद्र तोमर याने आपल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, "मी माझ्या खोलीत गेल्यानंतर थोड्याच वेळात माजी स्पेशल डीजी शैलेश सिंग, त्यांचा क्रिकेटपटू मुलगा शशांक सिंग आणि त्यांचा ड्रायव्हर माझ्या खोलीत घुसले. त्यांनी मला अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिघांनी मिळून मला हाताने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मला बेदम मारल्यानंतर त्यांनी मला जबरदस्तीने बंगल्याच्या बाहेर हाकलून दिले."
(नक्की वाचा- Pune Lohagad Case: सियाने लग्नाच्या शॉपिंगसाठी केतनकडून उकळली मोठी रक्कम; एवढ्या पैशांचं काय केलं?)
या घटनेनंतर घाबरलेल्या विपेद्र यांनी तातडीने रातीबड पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन क्रिकेटपटू शशांक सिंग, निवृत्त आयपीएस अधिकारी शैलेश सिंग आणि ड्रायव्हर मिश्रा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या खालील कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे: