Irani Cup : गावस्कर ते तेंडुलकरपर्यंत कुणालाही जमलं नाही ते सर्फराजनं केलं, Video

Irani Cup : सुनील गावस्करांपासून ते सचिन तेंडुलकरपर्यंत  एकाही दिग्गज बॅटरला मुंबईकडून खेळताना  जे जमलं नाही ते सर्फराजनं केलं आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

Irani Cup : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील टेस्ट सीरिजमध्ये सर्फराज खानला अंतिम 11 मध्ये संधी मिळाली नाही. पण, लखनौमध्ये सुरु असलेल्या इराणी ट्रॉफी स्पर्धेत सर्फराजनं इतिहास घडवला आहे. मुंबईच्या सर्फराजनं इराणी कप स्पर्धेत डबल सेंच्युरी झळकावली. त्यानं ही डबल सेंच्युरी 253 बॉलचा सामना करत 79.1 च्या स्ट्राईक रेटनं ही डबल सेंच्युरी पूर्ण केली. ही डबल सेंच्युरी पूर्ण करताच सर्फराजनं एक ऐतिहासिक रेकॉर्ड केला आहे.  

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

इराणी कप स्पर्धेत डबल सेंच्युरी झळकावणारा सर्फराज हा मुंबईचा पहिला क्रिकेटपटू आहे. 1960 साली इराणी कपला सुरुवात झाली. मुंबईनं आत्तापर्यंत तब्बल 13 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. पण मुंबईच्या टीमकडून या स्पर्धेत खेळणाऱ्या एकाही खेळाडूला  या स्पर्धेत डबल सेंच्युरी झळकावता आली नव्हती. सर्फराज ही कामगिरी करणारा पहिला मुंबई क्रिकेटर आहे. सुनील गावस्करांपासून ते सचिन तेंडुलकरपर्यंत  एकाही दिग्गज बॅटरला मुंबईकडून खेळताना  जे जमलं नाही ते सर्फराजनं केलं आहे. 

सर्फराजनं या खेळीच्या दरम्यान इराणी कप स्पर्धेच्या इतिहास मुंबईच्या बॅटरनं केलेला हा सर्वोच्च स्कोअर आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड रामनाथ पारकर यांच्या नावावर होता. त्यांनी 1972 साली 195 रन केले होते. 

सर्फराजनं यावेळी आणखी एका खास यादीत जागा मिळवली. इराणी कप स्पर्धेत डबल सेंच्युरी करणाऱ्या तरुण बॅटर्सच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीमध्ये सर्फराजच्या आधी यशस्वी जैस्वाल (21 वर्ष 63 दिवस), प्रवीण आम्रे (22 वर्ष 80 दिवस) आणि गुंडप्पा विश्वनाथ (25 वर्ष 255 दिवस ) हे आहेत. यापैकी यशस्वी जैस्वाल आणि प्रवीण आम्रे हे मुंबईकर असले तरी त्यांनी या स्पर्धेत शेष भारताविरुद्ध खेळताना डबल सेंच्युरी झळकावली होती. 

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 4 हजार आणि त्यापेक्षा जास्त रन सर्वाधिक सरासरीनं रन करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत सर्फराज दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये विजय मर्चंट दुसऱ्या क्रमंाकावर आहे. त्यानं 81.8 च्या सरासरीनं रन केले होते. सर्फराजची सध्याची सरासरी 69.6 आहे. 

( नक्की वाचा : IND vs BAN : 147 वर्षांमध्ये कुणालाही जमलं नाही ते रोहित-यशस्वीनं केलं! )

मुंबईची भक्कम स्थिती

सर्फराज बॅटिंगला आला तेव्हा मुंबईची अवस्था नाजूक होती. मुंबईनं 139 रन्सवर 4 विकेट्स गमावल्या होत्या. सर्फराजनं पहिल्यांदा मुंबईचा कॅप्टन अजिंक्य रहाणेसोबत शतकी पार्टनरशिप केली. तर तनुश कोटियनसोबत सातव्या विकेटसाठी 183 रनची पार्टनरशिप केली. मुंबईची दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस 9 आऊट 536 रन झाले होते. सर्फराज 276 बॉलमध्ये 221 रन काढून नाबाद आहे. मुंबईकडून अजिंक्य रहाणेनं 97, श्रेयस अय्यरनं 57 तर तनुश कोटियननं 64 रन काढले. 

Topics mentioned in this article