Jasprit Bumrah बुमराहनं इतिहास घडवला ! ICC चा हा सन्मान मिळवणारा पहिला भारतीय

ICC Mens Test Cricketer of The Year: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी एक गुड न्यूज आहे. भारताचा प्रमुख फास्ट बॉलर जसप्रीत बुमहारनं इतिहास घडवला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Jasprit Bumrah Named ICC Mens Test Cricketer of The Year: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी एक गुड न्यूज आहे. भारताचा प्रमुख फास्ट बॉलर जसप्रीत बुमहारनं इतिहास घडवला आहे. आयसीसीनं त्याची 2024 मधील सर्वोत्तम टेस्ट क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे. हा पुरस्कार मिळवणारा तो पहिलाच भारतीय फास्ट बॉलर आहे. यापूर्वी  राहुल द्रविड, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, रविचंद्रन अश्विन, विराट कोहली यांना हा पुरस्कार मिळवला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

बुमराहचं वर्ष

जसप्रीत बुमराहसाठी 2024 हे खास वर्ष ठरलं. त्यानं या वर्षात टेस्ट क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली. तो 2024 मध्ये 13 टेस्ट खेळाला. त्यामध्ये त्यानं 14.92 च्या सरासरीनं 71 विकेट्स घेतल्या. नुकत्याच झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्येही त्यानं ऑस्ट्रेलियन बॅटर्सनं नाचवलं. बुमराहनं या सीरिजमध्ये 32 विकेट्स घेतल्या.

राहुल द्रविड पहिला भारतीय

राहुल द्रविड ICC 'टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्काराचा मानकरी ठरलेला पहिला भारतीय क्रिकेटपटू होता. त्यानं 2004 साली सर्वोत्तम कामगिरी करत हा पुरस्कार मिळवला. त्यानंतर गौतम गंभीर (2009), वीरेंद्र सेहवाग (2010), रविचंद्रन अश्विन (2016) आणि विराट कोहली (2018) यांना हा पुरस्कार मिळाला आहे. 

Advertisement

( नक्की वाचा :  Sanju Samson : 'ते लोक तुझ्यावर जळतात', द्रविडचं नाव घेत संजू सॅमसनच्या वडिलांनी टाकला नवा बॉम्ब )

स्मृती मंधानालाही पुरस्कार

जसप्रीत बुमराहप्रमाणेच स्मृती मंधानानंही यंदाच्या आयसीसी पुरस्कारामध्ये बाजी मारली आहे. स्मृतीची 2024 मधील 'सर्वश्रेष्ठ महिला वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटर' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 

स्मृतीनं 2024 मधील 13 इनिंगमध्ये 747 रन केले. कोणत्याही कॅलेंडर वर्षातील ही तिची सर्वोत्तम कामगिरी आहे. 
 

Topics mentioned in this article