मेडिकल रिपोर्ट OK तरीही बुमराहाला का वगळण्यात आलं? निवड समितीच्या बैठकीची Inside Story

Jasprit Bumrah Ruled Out : चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला बॉल पडण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Jasprit Bumrah Ruled Out Of Champions Torphy: चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला बॉल पडण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला. भारतीय क्रिकेट टीमचा प्रमुख फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडला आहे. भारतीय क्रिकेट नियामक बोर्डानं (BCCI)  मंगळवारी रात्री याबाबतची अधिकृत घोषणा केली. बुमराहच्या जागेवर हर्षित राणाचा (Harshit Rana) टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

निवड समितीच्या बैठकीत काय झाली चर्चा?

निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर, हेड कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन रोहित शर्मा यांच्यात अहमदाबादमध्ये चर्चा झाली. त्यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बुमराहला न्यायचं की नवोदीत हर्षित राणाची निवड करायची याबाबत चर्चा झाली. 

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीनं (NCA) बुमराहचा दिलेला रिपोर्ट ओके होता. पण, तो बॉलिंग करत नव्हता. बुमराहचा स्कॅन रिपोर्ट ठीक होता. पण, त्याची निवड करायची की नाही याबाबतचा अंतिम निर्णय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरनं घ्यावा, असं एनसीएच्या नितीन पटेल यांनी स्पष्ट केलं होतं. 

बुमराहनं ट्रिटमेंट पूर्ण केली आहे. त्याचा स्कॅन रिपोर्ट देखील ठीक आहे, असं नितीन पटेल यांनी पाठवलेल्या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आले होते. पण, तो चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु होण्यापूर्वी बॉलिंग करु शकेल की नाही? याबाबत कोणताही निष्कर्ष काढणे अशक्य असल्याचं या रिपोर्टमध्ये स्पष्ट केले होते. त्यानंतर निवड समितीनं कोणताही धोका न पत्कारण्याचा निर्णय घेतला. 

Advertisement

( नक्की वाचा : IND vs ENG : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला गुड न्यूज, गिलनं दिला पाकिस्तानला गंभीर इशारा )

2002 मध्ये झाली होती चूक

यापूर्वी जसप्रीत बुमराहच्या बाबतीत 2022 साली एनसीए आणि निवड समितीचे हात पोळले होते. त्यावेळी टी20 वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजसाठी बुमराहचा दुखापतीनंतर  गडबडीत टीममध्ये समावेश करण्यात आला होता. पण, त्या सीरिजमध्ये बुमराह जखमी झाला आणि त्यानंतर तो T20 वर्ल्ड कपसह वर्षभर क्रिकेटपासून दूर होता. 

Advertisement

चेतन शर्मा त्यावेळी निवड समितीचे अध्यक्ष होते. यंदा आगरकरची कोणताही धोका पत्कारण्याची इच्छा नव्हती. बुमराहनं अजून पूर्णपणे बॉलिंग सुरु केलेली नाही. इतक्या कमी कालावधीमध्ये मॅचसाठी फिट होणे बुमराहसाठी अवघड होते. त्यामुळे निवड समितीनं जसप्रीत बुमराहचा टीममध्ये समावेश न करण्याचा निर्णय घेतला.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय टीम : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (व्हाईस कॅप्टन), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती

Advertisement