जाहिरात

IND vs ENG : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला गुड न्यूज, गिलनं दिला पाकिस्तानला गंभीर इशारा

India vs England 3rd ODI : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या वन-डेमध्ये शुबमन गिलनं (सेंच्युरी  झळकावली (Shubman Gill Scored Century) आहे.

IND vs ENG : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला गुड न्यूज, गिलनं दिला पाकिस्तानला गंभीर इशारा
मुंबई:

India vs England 3rd ODI : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या वन-डेमध्ये शुबमन गिलनं (सेंच्युरी  झळकावली (Shubman Gill Scored Century) आहे. या सीरिजमध्ये जबरदस्त फॉर्मात असलेल्या टीम इंडियाच्या व्हाईस कॅप्टननं त्याची वन-डे कारकिर्दीमधील सातवी सेंच्युरी 95 बॉलमध्ये 14 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं पूर्ण केली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

गिलचा फॉर्म पाकिस्तानला टेन्शन

शुबमन गिलनं या संपूर्ण सीरिजमध्ये सातत्यपूर्ण बॅटिंग केली आहे. त्यानं नागपूरमध्ये झालेल्या पहिल्या वन-डेमध्ये 87 रन काढले होते. तर कटकमधील दुसऱ्या वन-डेमध्ये 60 रनची खेळी केली. आणखी आठवडाभरानेच (19 फेब्रुवारी) चॅम्पिन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु होत आहे. या स्पर्धेपूर्वी गिल फॉर्मात आलाय.  त्याचा हा फॉर्म टीम इंडियासाठी गुड न्यूज आहे. 

दुसरिकडं पाकिस्तानसह बांगलादेश आणि न्यूझीलंडचं टेन्शन गिलनं चांगलंच वाढवलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत, पाकिस्तान, बांगालादेश आणि न्यूझीलंडचा एकाच गटात समावेश आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाला उत्सुकता असलेली भारत विरुद्ध पाकिस्तान लढत 23 फेब्रुवारी रोजी होत आहे.

मोदी स्टेडियम लकी

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम शुबमन गिलसाठी चांगलंच लकी आहे. त्यानं या स्टेडियमवर 2023 मध्ये 2 सेंच्युरी आणि 3 हाफ सेंच्युरी झळकावल्या होत्या. या स्टेडियमवर गिलची ही तिसरी सेंच्युरी आहे. 

टीम इंडियात 3 बदल

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन मॅचची वन-डे सीरिज टीम इंडियानं यापूर्वीच जिंकली आहे. शेवटच्या वन-डेसाठी भारतीय टीममध्ये तीन बदल करण्यात आले. रविंद्र जडेजा,वरुण चक्रवर्ती आणि मोहम्मद शमीच्या जागी वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंगचा समावेश करण्यात आलाय.

( नक्की वाचा : IND vs ENG सिनेमा पाहात होतो त्यावेळी... श्रेयस अय्यरच्या खुलाशानंतर रोहित आणि गंभीरवर होतीय टीका! )
 

टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंगला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. कॅप्टन रोहित शर्मा फक्त 1 रन काढून आऊट झाला. त्यानंतर शुबमन गिल आणि विराट कोहली जोडीनं भारतीय इनिंग सावरली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 116 रन्सची पार्टरनरशिप केली. मोठ्या खेळीच्या दिशेनं वाटचाल करत असलेला विराट कोहली 52 रन काढून आऊट झाला

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: