
IPL 2025, Mumbai Indians : आयपीएल 2025 ला 22 मार्चपासून सुुरुवात होत आहे. पाच वेळा स्पर्धा जिंकणारी मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) टीम मेगा ऑक्शननंतर नव्या रुपात या सिझनमध्ये उतरणार आहे. मुंबई इंडियन्सची पहिली मॅच चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध होणार आहे. सीएसकेनं देखील मुंबई इंडियन्स प्रमाणे पाचवेळा आयपीएल विजेतेपद पटकावले आहे. दोन्ही टीममधील लढती नेहमीच रंगतदार होतात. त्यामुळे या लढतीची सर्व फॅन्सना उत्सुकता आहे. आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला धक्का बसलाय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आयपीएल स्पर्धेतील सुरुवातीचा टप्पा खेळू शकणार नाही. बुमराह पाठदुखीतून सध्या बरा होत आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दरम्यान बुमराहची पाठदुखी बळावली होती. त्यामुळे त्याला सिडनीमध्ये झालेली शेवटची टेस्ट पूर्ण खेळता आली नव्हती.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये बुमराहनं 32 विकेट्स घेत 'प्लेयर ऑफ द सीरिज' पुरस्कार पटकावला होता. पण, त्यानंतर तो दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही खेळू शकला नव्हता. 'इसपीएन क्रिकइन्फो' नं दिलेल्या वृत्तानुसार बुमराह एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. अर्थात बीसीसीआयच्या मेडिकल टीमनं परवानगी दिल्यानंतरच बुमराह खेळू शकेल. तो नेमके किती सामने खेळणार नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
( नक्की वाचा : ...तर Jasprit Bumrah चं करिअर समाप्त होईल! दिग्गज बॉलरचा टीम इंडियाला इशारा )
मुंबई इंडियन्सकडं बुमराह नसला तरी फास्ट बॉलिंगमध्ये वैविध्य आहे. ट्रेंट बोल्ट, दिपक चहर, रासी टोप्ले, कॉर्बिन बॉर्श, अर्जुन तेंडुलकर, सत्यनारायण राजू, अश्विनी कुमार हे फास्ट बॉलर्स टीमकडं आहेत. त्याचबरोबर हार्दिक पांड्या आणि राज बावा हे ऑल राऊंडर्स टीममध्ये आहेत.
मुंबई इंडियन्सचे सुरुवातीचे सामने
मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (CSK) - 23 मार्च - चेन्नई
मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध गुजरात टायट्न्स (GT) - 29 मार्च - अहमदाबाद
मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) - 31 मार्च - मुंबई
मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (LSG) - 4 एप्रिल - लखनौ
मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु (RCB) - 7 एप्रिल - मुंबई
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world