Jasprit Bumrah: 'Inaccurate again'! जसप्रीत बुमराहचा बड्या खेळाडूला 'तगडा' रिप्लाय, वाचा काय आहे वाद?

Jasprit Bumrah :अनुभवी बॉलर जसप्रीत बुमराहनं  माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफला सोशल मीडियावर दिलेलं उत्तर चर्चेचा विषय बनलंय.

जाहिरात
Read Time: 2 mins
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहनं सोशल मीडियावर भन्नाट यॉर्कर टाकलाय.
मुंबई:


Jasprit Bumrah News: टीम इंडियानं यूएईमध्ये सुरु असलेल्या आशिया चषक स्पर्धेची फायनल मोठ्या दिमाखात गाठली आहे. त्याचवेळी अनुभवी बॉलर जसप्रीत बुमराहनं  माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफला सोशल मीडियावर दिलेलं उत्तर चर्चेचा विषय बनलंय. कैफने बुमराहच्या 'वर्कलोड मॅनेजमेंट' आणि कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या रणनितीवर प्रश्न उपस्थित केला होता. यावर, बुमराहने 'Inaccurate before inaccurate again' या शब्दांत कैफला थेट आणि स्पष्ट प्रत्युत्तर दिले आहे, ज्यामुळे ही जुगलबंदी चर्चेचा विषय ठरली आहे

काय आहे प्रकरण?

मोहम्मद कैफनं सध्याच्या टीम इंडियातील बुमराहच्या वर्कलोड मॅनेजमेंटवर प्रश्न उपस्थित केले होते. भारताचा टी20 कॅप्टन सूर्यकुमार यादव बुमराहला ज्या प्रकारे वापरतोय, त्यावर कैफनं प्रश्न उपस्थित केला होता.    यावर, 31 वर्षीय बुमराहने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर कैफला प्रत्युत्तर दिले.

( नक्की वाचा : Abhimanyu Easwaran: 27 सेंच्युरी, 7885 रन्स! तरीही दुर्लक्ष का? टीम इंडियाच्या 'चक्रव्युहा'त अडकला 'अभिमन्यू' )
 

काय म्हणाला कैफ?

मोहम्मद कैफनं X वर पोस्ट केलं की, रोहितच्या कॅप्टनसीमध्ये बुमराह साधारणपणे 1, 13, 17, 19 वी ओव्हर टाकत असे.  सूर्याच्या नेतृत्वाखाली, आशिया चषकात, त्याने सुरुवातीला तीन ओव्हर्सचा स्पेल टाकला.  दुखापत टाळण्यासाठी, बुमराह आजकाल त्याचे शरीर 'वॉर्म अप' झाल्यावर बॉलिंग करण्यास प्राधान्य देतो. उर्वरित 14 ओव्हरमध्ये बुमराहचे 1 ओव्हर असणे हा बॅटिंग टीमला मोठा दिलासा आहे. वर्ल्ड कपमध्ये मोठ्या टीमविरुद्ध भारताला हे महाग पडू शकते.  

बुमराहनं ही पोस्ट रिट्विट करत कैफचा हा दावा चुकीचा असल्याचं म्हंटलं आहे. 'Inaccurate before inaccurate again'  या शब्दात बुमराहनं कैफला मोजकं आणि थेट उत्तर दिलं आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article