
India vs West Indis Team Selection : राहुल द्रविडनंतर (Rahul Dravid) गौतम गंभीर (Gautam Gambhir) टीम इंडियाचा हेड कोच झाल्यानंतर त्यानं काही महत्त्वाचे बदल केले. या बदलांमध्ये, सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळणे अनिवार्य करण्यात आले. अनेक वर्षांनंतर विराट कोहलीसारख्या मोठ्या खेळाडूंनाही रणजी करंडक स्पर्धेत (Ranji Trophy) दिल्लीकडून खेळला. या सर्व बदलांचे अनेकांनी स्वागत केलं.
देशांतर्गत क्रिकेटचा दर्जा सुधारणे हा याचा एक उद्देश होता. त्याचबरोबर टीम इंडियाच्या निवडीसाठी देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार प्रदर्शन हा पहिला आणि महत्त्वाचा निकष असेल असं या बदलामुळे मानलं जात होतं. निवड समिती आणि हेड कोच गंभीरनं याबाबत तसे स्पष्ट संकेत दिले होते. त्यानंतरही प्रत्यक्ष टीमची निवड करताना याबाबत साफ दुर्लक्ष होत असल्याची तक्रार निवड समितीला दूर करता आलेली नाही. वेस्ट इंडिज विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची निवड आज (गुरुवार, 25 सप्टेंबर) झाली. त्यावेळी हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.
अभिमन्यूवर पुन्हा अन्याय
देशांतर्गत क्रिकेटमध्ये (Domestic Cricket) सातत्याने चमकदार कामगिरी, 'इंडिया-ए' (India-A) टीमची कॅप्टनसी करुनही ओपनिंग बॅटर अभिमन्यू ईश्वरनची टीम इंडियात निवड झालेली नाही. 2 ऑक्टोबरपासून वेस्ट इंडिज विरुद्धची टेस्ट सीरिज सुरु होत आहे. त्यासाठी निवडलेल्या टीममध्ये अभिमन्यूला संधी मिळालेली नाही.
( नक्की वाचा : भारताला मिळाला हुकमी एक्का! ODI मध्ये रोहित शर्माच्या 264 धावांचाही रेकॉर्ड मोडलाय, नारायण जगदीशन आहे तरी कोण? )
अभिमन्यू ईश्वरनची फर्स्ट क्लास क्रिकेटमधील आकडेवारी दमदार आहे. त्याने आजवर 104 सामन्यांमध्ये 48.67 च्या उत्कृष्ट सरासरीने 7885 रन्स केले आहेत. यामध्ये 27 सेंच्युरी आणि 31 हाफ सेंच्युरीचा समावेश आहे.
या विक्रमी कामगिरीनंतरही त्याला राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळत नसल्याने, त्याच्यावर अन्याय होत असल्याची भावना क्रिकेट फॅन्स आणि तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
टीम इंडियात स्थान पण पदार्पण नाही
ईश्वरनची सर्वप्रथ 2022 मध्ये टीम इंडियात निवड झाली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (England) दौऱ्यांसाठीही त्याला टीममध्ये स्थान मिळाले होते. मात्र, त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. टीममध्ये असूनही त्याचे काम केवळ ड्रेसिंग रूम आणि मैदानावर पाणी पुरवण्यापुरतेच मर्यादित राहिले. विशेष म्हणजे, मागील इंग्लंड दौऱ्यावरील टेस्ट टीममध्ये तो होता, पण आता वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याला वगळण्यात आले आहे.
( नक्की वाचा : Smriti Mandhana: स्मृती मंधनाचं ऑस्ट्रेलिया विरुद्ध वादळ, दमदार सेंच्युरीसह विराट कोहलीचाही मोडला रेकॉर्ड )
काय सांगितलं कारण?
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम जाहीर झाल्यानंतर निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरनं पत्रकार परिषदेत अभिमन्यूची निवड न झाल्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आगरकरनं सांगितलं की, "टीम परदेश दौऱ्यावर जाते, तेव्हा आम्ही तिसऱ्या ओपनरची निवड करतो. सध्याच्या टीममध्ये आमच्याकडे अक्षर पटेलच्या रूपात एक अतिरिक्त स्पिनरचा पर्याय आहे. आम्ही केवळ 15 खेळाडूंची निवड करतो. केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी चांगली कामगिरी केली आहे. आम्हाला अभिमन्यू ईश्वरनची गरज भासली, तर आम्ही त्याला बोलवू शकतो. अभिमन्यू ईश्वरनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे."
निवड समितीच्या या स्पष्टीकरणानंतरही, ईश्वरनला किमान संधी देऊन स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी मिळणे आवश्यक आहे, असे मत क्रिकेट तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world