ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra Wife) याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पाहून चाहत्यांना धक्काच बसला. नीरजच्या लग्नाची अजिबातच चर्चा झाली नाही. तर त्याच्या कुटुंबीयांनी अत्यंत खासगी पद्धतीने लग्नसोहळा केला. नीरज दोन दिवसांपूर्वी हिमानी मोर हिच्यासोबत लग्नबंधनात अडकला आहे. (Who is Neeraj Chopra's wife)
आता हिमानी मोर (Who is Himani Mor) कोण आहे याचं सर्चिंग मोठ्या प्रमाणात होत आहे. नीरजची पत्नी हिमानी मोर हिने अमेरिकेत शिक्षण घेतलं. याशिवाय सोनीपतच्या हिमानीने टेनिसमध्येही प्रयत्न केला आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, नीरज चोप्राच्या पत्नीचं पूर्ण नाव हिमानी मोर आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांचं लग्न पार पडलं. नीरजचे काका भीम यांनी सांगितलं की, नवं दाम्पत्य हनिमूनसाठीही रवाना (Neeraj Chopra's marriage) झालं आहे. भारतातच हे लग्न पार पडलं आहे. मात्र यांचं लग्न नेमकं कुठे झालं, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.
नक्की वाचा - Wankhede Stadium 'तुम्ही घाटी लोक...' मराठी माणसाच्या अपमानातून उभं राहिलं मुंबईचं वानखेडे स्टेडियम
हिमानी मोर सध्या अमेरिकेत राहून शिक्षण घेत आहे. ती फ्रँकलिन पियर्स विद्यापीठात स्पोर्ट्स व्यवस्थापन (मेजर) याचं शिक्षण घेत आहे. हे विद्यापीठ न्यू हॅम्पशायरमध्ये आहे. हिमानी दिल्ली मिरांडा हाऊसची माजी विद्यार्थिनी आहे. येथून तिने राज्यशास्त्र आणि फिजिकल एज्युकेशनमध्ये पदवीपर्यंतच शिक्षण घेतलं. याशिवाय हिमानीने फ्रँकलिन पियर्स विद्यापीठात असिस्टंट कोच म्हणूनही काम केलं आहे.
नीरजप्रमाणे हिमानीदेखील खेळाडू आहे. ती टेनिस खेळत होती. हिमानीने जागतिक विद्यापीठ टेनिस गेम्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2017 मध्ये भारताकडून जागतिक विद्यापीठ टेनिस चॅम्पियनशीपदेखील खेळली होती. हिमानी मोर ही सोनीपतच्या लिटिल एंजल्स शाळेत शिकली. याच शाळेत सुमित नागलनेही शिक्षण घेतलं. हिमानी मोरे साऊथइस्टर्न लुजियाना विद्यापीठातून शिक्षण घेतलं. गोल्डन बॉय नीरज चोप्राने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करीत लग्नाची गुड न्यूज दिली. या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय, आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात आपल्या कुटुंबासह...