Jay Shah : जय शहांना ICC कडून किती मिळणार पगार? BCCI कडून किती मिळत होते पैसे?

Advertisement
Read Time: 2 mins
J
मुंबई:

Jay Shah, ICC Chairman Salary:  जय शाह यांची आयसीसीचे संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. 35 वर्षांचे जय शाह 1 डिसेंबरपासून या पदाचा कार्यभार स्वीकारतील. आयसीसी ही क्रिकेटचं नियमन करणारी सर्वोच्च संस्था आहे. या पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांना किती पगार मिळणार? तसंच शाह यांना BCCI सचिव म्हणून किती पगार मिळत होता ? याची अनेकांना उत्सुकता असते. तुमच्या मनातील या प्रश्नाचं आम्ही उत्तर देणार आहोत. 

जय शाह यांना आयसीसी संचालक म्हणून किती पगार मिळणार? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला ते बीसीसीआयचे पदाधिकारी असताना त्यांना किती पैसे मिळतात हे समजून घ्यावं लागेल. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

BCCI कडून किती मिळत होते पैसे?

बीसीसीआयमध्ये अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष ही पदं 'मानद' असतात. या पदावर काम करणाऱ्या लोकांना निश्चित पगार नसतो. या पदावर काम करणाऱ्यांना बोर्डाकडून काम करण्यासाठी खर्च दिला जातो. त्याचबरोबर कामकाजाच्या दरम्यान त्यांना अनेक प्रकारची भत्ते तसंच खर्च दिले जातात. 

'मानद' पदाधिकारी पदावर असताना आयसीसीची बैठक किंवा भारतीय टीमशी संबंधित कोणत्या कामासाठी परदेशात दौऱ्यावर गेले तर त्यांना प्रत्येक दिवसासाठी 1000 डॉलर (जवळपास 82 हजार रुपये) भत्ता दिला जातो. 

( नक्की वाचा : Jay Shah : जय शाह बनले ICC चे बॉस, केला नवा रेकॉर्ड )

इतकंच नाही तर 'मानद' पदाधिकारी प्रवास करताना बोर्डाकडून त्यांना प्रवासात कोणताही त्रास होणार नाही, याची विशेष खबरदारी घेतली जाते. विमान प्रवासात त्यांना नेहमी फर्स्ट क्लास सुविधा दिल्या जातात. 

Advertisement

परदेश दौऱ्याप्रमाणेच ते देशात कोणत्याही बैठकांसाठी जातात तेंव्हा त्यांना दररोज 40 हजार रुपयांचा भत्ता दिला जातो. त्याचबरोबर बिझनेस क्लासमधून प्रवास करण्याची सुविधा दिली जाते. त्याचबरोबर ते बीसीसीआयच्या कामकाजासाठी दुसऱ्या शहराचा दौरा करतात त्यावेळी त्यांना दररोज 30 हजा रुपये भत्ता दिला जातो. तसंच ते त्या गावात हॉटेलमध्ये राहण्याचा सर्व खर्च बीसीसीआयकडून केला जातो.

( नक्की वाचा : जय शहांनंतर BCCI सचिव कोण होणार? काँग्रेस नेत्यासह महाराष्ट्र भाजपामधील दिग्गजचीही चर्चा )

आयसीसीकडून किती मिळतो पगार? 

बीसीसीआयप्रमाणेच आयसीसीच्या 'मानद' पदावर नियुक्त व्यक्तींना कोणताही निश्चित पगार नसतो. तर त्यांचा प्रवास, बैठका या सर्व गोष्टींसाठी त्यांना खर्च आणि भत्ता मिळतो. अर्थात, आयसीसीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांचा प्रवास, बैठका आणि अन्य सुविधांसाठी किती भत्ता मिळतो याची अधिकृत माहिती आयसीसीकडून अद्याप देण्यात आलेली नाही. 
 

Advertisement
Topics mentioned in this article