Joe Root : जो रुटचं मोठं स्वप्न पूर्ण, दत्त पौर्णिमेला सुटलं 12 वर्षांचं 'ग्रहण'! सचिनपासून किती मागं?

Joe Root century : इंग्लंडचा दिग्गज बॅटर जो रुटच्या आयुष्यातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Joe Root : जो रुटची 12 वर्षांची प्रतीक्षा पूर्ण झाली आहे.
मुंबई:

Joe Root century : इंग्लंडचा दिग्गज बॅटर जो रुटच्या आयुष्यातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण झाली आहे. त्यानं अखेर ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सेंच्युरी गाजवली. जगभरातील क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या जो रुटचा ऑस्ट्रेलियातील रेकॉर्ड साधारण आहे. त्याला गेल्या 12 वर्षात ऑस्ट्रेलियामध्ये एकदाही सेंच्युरी झळकावता आलेली नाही. अखेर 12 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यानं ऑस्ट्रेलियात टेस्ट सेंच्युरी केली आहे.विशेष म्हणजे भारतात दत्त पौर्णिमा आज साजरी होत आहे. या शुभ दिवशी त्याच्या कारकीर्दीमधील मोठं ग्रहण सुटलं आहे. 

अडचणीतून दाखवला 'रुट'

अ‍ॅशेस सीरिजमधील दुसऱ्या टेस्टला आजपासून (गुरुवार, 4 डिसेंबर ) ब्रिस्बेनमधील गाबाच्या मैदानात सुरुवात झाली. ही डे-नाईट टेस्ट आहे. या टेस्टच्या पहिल्या दिवशी इंग्लंडची सुरुवात खराब झाली. मिचेल स्टार्कनं सुरुवातीलाच दोन धक्के दिले. इंग्लंडची टीम 2 आऊट 5 अशा बिकट परिस्थितीमध्ये असताना रुट बॅटिंगला आला.

जो रुटनं पर्थमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टचं अपयश मागे टाकत संयमी बॅटिंग केली.त्यानं 181 बॉल्समध्ये 11 फोरच्या मदतीनं ऑस्ट्रेलियातील पहिली टेस्ट सेंच्युरी झळकावली. यापूर्वी ऑस्ट्रेलियात त्याची सर्वोत्तम खेळी 2021 मध्ये याच मैदानावर केलेली 89 रनची होती.

( नक्की वाचा : IND vs SA : दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या T20 सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, पण सर्वात मोठा प्रश्न कायम! )
 

हेडनला दिलेला शब्द पाळला

अ‍ॅशेस  2025-26 चा सिझन सुरु होण्यापूर्वी  ऑस्ट्रेलियाचा माजी ओपनर  मॅथ्यू हेडन (Matthew Hayden) याने रूटच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त करत एक मोठं वक्तव्य केलं होतं. 'रूट या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियात सेंच्युरी करू शकला नाही, तर मी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) नग्न धावेन,' असे हेडन म्हणाला होता. 

Advertisement

विशेष म्हणजे, हेडनच्या मुलीनेही रूटला शतक करण्याची विनंती केली होती, जेणेकरून तिच्या वडिलांना मायदेशातील प्रेक्षकांसमोर लाजिरवाणे होणार नाही. रूटने ही विनंती स्वीकारली होती आणि ब्रिस्बेनमध्ये पहिली टेस्ट सेंच्युरी झळकावत त्याने हेडन आणि त्याच्या मुलीला निराश केले नाही.

सचिनपासून किती मागं?

रूटची ही ऑस्ट्रेलियातील पहिली आणि एकूण 40 वी टेस्ट सेंच्युरी आहे.यामुळे तो आता सर्वाधिक टेस्ट सेंच्युरी करणाऱ्या बॅटर्सच्या यादीत  ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगपासून (Ricky Ponting) फक्त एका सेंच्युरीनं  मागे आहे. मात्र, रूटला अव्वल दोनमध्ये पोहचण्यासाठी  अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. दक्षिण आफ्रिकेचा ऑल राऊंडर खेळाडू जॅक कॅलिस (Jacques Kallis) 45 टेस्ट सेंच्युरीसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर सर्वकालीन महान खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) 51 टेस्ट सेंच्युरीसह  या यादीत अव्वल आहे.

Advertisement


 

Topics mentioned in this article