Team India squad for Five Match T20I Series vs SA: वनडे (एकदिवसीय) मालिकेपाठोपाठ आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या 5 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. या टीमचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. या निवडानंतर टीम इंडियांच्या फॅन्समध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे, कारण एका चांगल्या फिनिशरला टीममध्ये स्थान मिळाले नाही, तर दुसऱ्या बाजूला एका महत्त्वाच्या बॅटरच्या फिटनेसबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे.
टीम निवडीनंतरचे मोठे प्रश्न
बीसीसीआयने जाहीर केलेल्या या 15 सदस्यीय टीमबद्दल चाहत्यांमध्ये दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, ज्यांची उत्तरं अजून मिळालेली नाहीत.
शुभमन गिलच्या जागेवर पर्याय कोण?
या टीममध्ये शुभमन गिलचा समावेश करण्यात आला आहे, परंतु त्याची निवड त्याच्या 'फिटनेस'वर आधारित असेल असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये गिल जखमी झाला होता आणि तेव्हापासून तो सक्रिय क्रिकेटपासून दूर आहे. याचा अर्थ, तो पूर्णपणे फिट असेल तरच टीममध्ये खेळेल. पण बीसीसीआयने गिल फिट न झाल्यास त्याच्या जागेवर कोण असेल, म्हणजेच कोणत्याही 'स्टँड-बाय' खेळाडूचं किंवा पर्यायाचं नाव जाहीर केलेलं नाही. गिल उपलब्ध न झाल्यास, टीममध्ये कोणत्या खेळाडूला संधी मिळेल, हा मोठा प्रश्न आहे.
( नक्की वाचा : Gautam Gambhir : गौतम गंभीरची 'ती' चूक महागात पडणार? BCCI चा पारा चढला, पडद्यामागे काय घडलं? )
रिंकू सिंहला का वगळले?
यापूर्वी टी20 टीमचा भाग असलेला बॅटर रिंकू सिंह याला या टीममधून वगळण्यात आले आहे. रिंकूने 'फिनिशर' म्हणून टीममध्ये आपलं स्थान पक्कं केलं होतं, पण त्याला बाहेरचा रस्ता दाखवल्याने त्याचे चाहते निराश झाले आहेत.तज्ज्ञांच्या मतानुसार, सध्या टीममधील वाढती स्पर्धा आणि ऑलराऊंडर्सची संख्या यामुळे रिंकू सिंग स्पर्धेतून बाहेर झाला.
रिंकू केवळ बॅटिंगमध्येच योगदान देऊ शकतो आणि बॉलिंग करू शकत नाही, हाच मुद्दा त्याच्यावर भारी पडला आहे. रिंकूच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का आहे. दुसरीकडे, आसामचा कॅप्टन आणि राजस्थान रॉयल्सचा ऑलराऊंडर रियान पराग यालाही टीममध्ये जागा मिळाली नाही.
( नक्की वाचा : Palash Muchhal : 'स्मृतीपेक्षाही दोघांची जास्त जवळीक', पलाश ढसढसा रडला, आईनं सांगितलं 'त्या' दिवशी काय घडलं? )
हार्दिक पांड्याचं दमदार कमबॅक
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील मालिकेत दुखापतीमुळे बाहेर असलेला स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या पूर्णपणे फिट होऊन टीममध्ये परतला आहे. त्याने नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टूर्नामेंटमध्ये बडोदाविरुद्ध 77 रनची नाबाद इनिंग खेळण्यासोबतच 1 विकेटही घेतली.
या प्रदर्शनातून त्याने आपली फिटनेस आणि फॉर्म सिद्ध केला आहे. त्याचबरोबर, डाव्या हाताचा बॅटर यशस्वी जयस्वालला निराशा सहन करानी लागली आहे.पण संजू सॅमसनवरील निवड समितीचा विश्वास कायम आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय टीम:
बॅटर: सूर्यकुमार यादव (कॅप्टन), शुभमन गिल (फिट असल्यास), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा
ऑलराऊंडर: हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर
विकेटकीपर: जितेश शर्मा, संजू सॅमसन
बॉलर: जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world