Champions Trophy 2025 : 2083 दिवसांचा दुष्काळ संपला, पण इंग्लंडचा सुपरस्टार मैदानात रडला, Video

Champions Trophy 2025, AFG vs ENG : इब्राहिम झाद्रानचे 177 रन्स आणि अझमतुल्ला ओमरझाईच्या 5 विकेट्सच्या जोरावर अफगाणिस्ताननं इंग्लंडचा 8 रन्सनं पराभव केला.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Champions Trophy 2025, AFG vs ENG : इब्राहिम झाद्रानचे 177 रन्स आणि अझमतुल्ला ओमरझाईच्या 5 विकेट्सच्या जोरावर अफगाणिस्ताननं इंग्लंडचा 8 रन्सनं पराभव केला. अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवानंतर इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. 2019 मधील वन-डे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या इंग्लिश टीममध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. पण, त्यांना यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीची सेमी फायनल गाठण्यात अपयश आलं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

अफगाणिस्ताननं पहिल्यांदा बॅटिंग करत 7 आऊट 325 रन्स केले होते. 326 रन्सचा पाठलाग करताना इंग्लंडची संपूर्ण टीम 49.5 ओव्हर्समध्ये 317 रन्सवर ऑल आऊट झाली. इंग्लंडकडून अनुभवी जो रुटनं जोरदार प्रतिकार केला. त्यानं 111 बॉलमध्ये 11 फोर आणि 1 सिक्सच्या जोरावर 120 रन्स केले. 

इंग्लंडच्या माजी कॅप्टनची वन-डे कारकिर्दीमधील ही 17 वी सेंच्युरी होती. पण, या सेंच्युरीसाठी त्याला तब्बल 2083 दिवस लागले. रुटनं यापूर्वी 2019 साली वेस्ट इंडिज विरुद्ध सेंच्युरी झळकावली होती. त्यानंतरच्या 6 वर्षात त्यानं वन-डे क्रिकेटमध्ये 10 हाफ सेंच्युरी झळकावल्या होत्या. पण, त्याला सेंच्युरीनं कायम हुलकावणी दिली होती.

( नक्की वाचा : Champions Trophy : अफगाणिस्तानच्या खेळाडूची इंग्लंडविरुद्ध सेंच्युरी, पण पाकिस्तानची होतीय थट्टा! )

इंग्लिश फॅन्सना जो रुटच्या सेंच्युरीचा आनंद फार काळ साजरा करता आला नाही. तो 120 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर अफगाणिस्ताननं कमबॅक करत मॅच जिंकली आणि इंग्लंडला स्पर्धेतून बाहेर काढलं. अफगाणिस्ताविरुद्ध झालेल्या पराभवाचं शल्य रुटला लपवता आले नाही. मॅच संपल्यानंतर रडत असलेल्या रुटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Advertisement

इंग्लंडचा माजी कॅप्टन असलेला जो रुट हा क्रिकेट विश्वातील दिग्गज बॅटर म्हणून ओळखला जातो. त्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 36 सेंच्युरी आणि 65 हाफ सेंच्युरीसह 12972 रन्स केले आहेत. त्याची सरासरी 50.87 इतकी आहे. 

रुटचा सध्याचा फॉर्म पाहाता तो टेस्ट क्रिकेटमधील सर्वाधिक रन्स करण्याचा सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडेल असा दावा करण्यात येतोय. त्याची आता पुढची खरी परीक्षा यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टेस्ट सीरिजमध्ये असेल. कारण ऑस्ट्रेलियन पिचवरही त्याचा रेकॉर्ड साधारण आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article