FIFA WC 2026: फिफाच्या मैदानात मेस्सी मॅजिक! अखेरच्या क्षणी निर्णायक घाव; अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक

विजयासह अर्जेंटिनाने सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला असून, आता रविवारी न्यू जर्सीच्या मेटलाइफ स्टेडियमवर त्यांचा सामना बलाढ्य स्पेनशी होणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

FIFA World Cup 2026, Argentina vs England: फुटबॉलच्या मैदानावर पुन्हा एकदा लिओनेल मेसी नावाच्या जादूगाराने आपल्या खेळाचे दर्शन घडवत अर्जेंटिनाला फिफा वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम फेरीत पोहोचवले आहे. अटलांटा स्टेडियमवर झालेल्या अत्यंत चुरशीच्या उपांत्य सामन्यात अर्जेंटिनाने इंग्लंडवर २-१ अशी मात केली. या विजयासह अर्जेंटिनाने सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला असून, आता रविवारी न्यू जर्सीच्या मेटलाइफ स्टेडियमवर त्यांचा सामना बलाढ्य स्पेनशी होणार आहे.

Lionel Messi: सेमीफायनलच्या लढतीपूर्वी मेस्सीने पिला 'तो' खास चहा? वाचा काय आहे ते सिक्रेट कनेक्शन

फिफामध्ये मेसी मॅजिक! अखेरच्या क्षणात बाजी मारली

​सामन्याच्या ८५ व्या मिनिटापर्यंत इंग्लंड १-० अशा आघाडीवर होते. एंथनी गॉर्डनने ५५ व्या मिनिटाला गोल करत इंग्लंडला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले होते. मात्र, अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेसीचा इरादा वेगळाच होता. सामन्याच्या शेवटच्या पाच मिनिटांत मेसीने खेळाचे पारडे पूर्णपणे फिरवून टाकले. ८५ व्या मिनिटाला मेसीने एंजो फर्नांडीजला दिलेला अचूक पास आणि त्यावर फर्नांडीजने केलेले गोल, याने सामन्यात बरोबरी साधली.

Advertisement

त्यानंतर स्टॉपेज टाइममध्ये मेसीने पुन्हा एकदा आपली प्रतिभा सिद्ध करत लौटारो मार्टिनेजसाठी एक शानदार क्रॉस दिला, ज्यावर मार्टिनेजने हेडरने गोल करत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. इंग्लंडच्या डिफेन्सने संपूर्ण सामन्यात चपळाई दाखवली, मात्र मेसीच्या अनुभवापुढे त्यांची ही भिंत अखेरच्या क्षणी कोसळली.

दरम्यान, या विजयासह, गतविजेत्या अर्जेंटिनाने सलग दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. रविवारी न्यू जर्सीमधील मेटलाइफ स्टेडियमवर त्यांचा सामना युरोपियन चॅम्पियन स्पेनशी होईल. ३९ वर्षीय मेस्सीने पुन्हा एकदा सिद्ध केले की मोठ्या सामन्यांमधील त्याचा अनुभव आणि खेळ समजून घेण्याची त्याची क्षमता कोणत्याही सामन्याची दिशा बदलू शकते.

( नक्की वाचा : 15 व्या वर्षापासून पत्रकारिता अन् तब्बल 18 वर्ल्ड कपचा अनुभव; 91 वर्षांच्या पत्रकारासमोर मेस्सीचे कोच नतमस्तक! )