लिओनल मेस्सीचा भारत दौरा चाहत्यांना अविस्मरणीय आठवणी देऊन गेला आहे. मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी लोकांना हजारो रुपयांचा तिकीट काढून स्टेडिअममध्ये उपस्थिती लावली. मात्र चाहत्यांना संघर्ष इथेच संपला नाही, तर गर्दीत मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी देखील बराच ताटकळत बसावं लागलं. कोलकात्यात तर गैरव्यवस्थापनामुळे मेस्सी फन्सना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. चाहत्यांना 20 रुपयांची पाण्याची बॉटल अनेक पटीने महाग विकली गेली. स्टेडियममध्ये पाण्याची बाटली आणण्यास परवानगी नसल्याने लोकांना देखील एवढी महाग पाण्याची बाटली खरेदी करण्याशिवाय पर्याय नव्हता.
20 रुपयांची पाण्याचा बाटली 200 रुपयांना
मेस्सीच्या या कार्यक्रमाल उपस्थित असलेल्या एका चाहत्यांना या घटनेची व्हिडीओ शूट करून इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यावर त्याने लिहिलं की, स्टेडियमच्या आतमध्ये वैयक्तिक पाण्याची बाटली नेण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. पाण्याची सोय आत उपलब्ध असेल, असे आयोजकांनी सांगितले होते. मात्र, तासन्तास आपल्या आवडत्या खेळाडूंना प्रोत्साहन दिल्यानंतर, चाहत्यांना पाण्याची गरज भासली. त्यावेळी एका पाण्याची बाटलीसाठी 200 रुपये मोजावे लागले. ज्या पाण्याच्या बाटलीची किंमत फक्त 20 रुपये आहे.
एका चाहत्याने 200 रुपयांना विकली जाणारी बाटली 100 रुपयांना देखील मागितली. पण त्यांना ती देण्यात आली नाही. अखेर पर्याय नसल्यामुळे अनेकांना इतक्या जास्त दरात पाणी विकत घ्यावे लागले.
पाहा VIDEO
(नक्की वाचा- VIDEO Viral: मेस्सी फॅन्सची 'हटके स्टाईल'! एका सुरात घोषणाबाजी, मुंबई पोलिसांच्या चेहऱ्यावरही फुललं हसू)
आयोजकांवर गंभीर आरोप
चाहत्यांनी या प्रकाराबद्दल आयोजक सताद्रु दत्त (Satadru Dutta) आणि कार्यक्रमावर देखरेख करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. "आयोजकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या माहितीशिवाय अशा प्रकारची प्रचंड नफेखोरी आणि किंमत वाढ शक्य नाही. ही गंभीर गैरव्यवस्थापनाची आणि भ्रष्टाचाराची बाब आहे. आयोजकांनी आपल्या फायद्यासाठी लोकांची अक्षरशः लूट केली आहे."
संपूर्ण प्रकरणामुळे चाहत्यांमध्ये मोठा संताप पसरला आहे. या प्रकाराची योग्य चौकशी करून आयोजकांना आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.