Lionel messi: 100 कोटींचं जेट, 100 कोटींचं घर!, लियोनेल मेस्सीची एकूण संपत्ती किती?

मेस्सीसाठी हजारो लोक एकाच वेळी रस्त्यावर आल्याचे पाहीले.

जाहिरात
Read Time: 2 mins

38 वर्षीय लिओनेल मेस्सी (Lionel Messi) केवळ फुटबॉलच्या इतिहासात आपले नाव कोरत नाहीत, तर ते जागतिक स्तरावर एक मोठे व्यावसायिक साम्राज्य देखील उभारत आहेत. त्याला जगातील प्रत्येक कंपनी आपला ब्रँड अबॅसिडर बनवण्यासाठी तयार असते. त्यांनी फुटबॉल आणि  जाहीरातींच्या माध्यमातून मोठी संपत्ती उभी केली आहे. त्यामुळे तो जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आहे.त्यांची अंदाजित एकूण संपत्ती 850 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 7,700 कोटी रुपये इतकी आहे. त्यांची कमाई अनेक स्त्रोतांद्वारे होते. ज्यात फुटबॉल सामन्यांची फी आणि विविध कंपन्यांची प्रायोजकत्वे (Sponsorship) यांचा समावेश आहे.

नक्की वाचा - चर्चा तर होणारचं! वानखेडेत सचिन-मेस्सीनं एकमेकांना दिलं 'हे खास गिफ्ट, यात लपलंय 1 सीक्रेट, तुम्ही पाहिलं का?

प्रायोजकत्व करार आणि व्यवसाय
मेस्सी अनेक जागतिक कंपन्यांशी जोडलेला आहे. जाहिरातींच्या माध्यमातून तयांची वार्षिक कमाई सुमारे 70 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. त्यांनी ऍडिडास (Adidas) सोबत लाइफटाइम डील केली आहे. ज्याची किंमत एक अब्ज डॉलरपेक्षा (One Billion Dollar) अधिक आहे. याव्यतिरिक्त, ऍपल, पेप्सी, मास्टरकार्ड, कोनामी यांसारखे मोठे ब्रँड्स देखील त्यांच्यासोबत जोडलेले आहेत.

रियल इस्टेट आणि लक्झरी मालमत्ता
मेस्सी यांनी रियल इस्टेट क्षेत्रातही मोठे गुंतवणूक केली आहे. प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, मेस्सी यांनी रियल इस्टेटमध्ये 50 ते 60 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. यात बार्सिलोना, मियामी, अँडोरा आणि लंडन येथील आलिशान घरांचा समावेश आहे. स्पेनजवळील इबिझा आयलँड (Ibiza Island) येथे मेस्सी यांचे सर्वात महागडे आणि आलिशान घर आहे. ज्याची किंमत अंदाजे 100 कोटी रुपये आहे.

Advertisement

स्वतःचा ब्रँड
रियल इस्टेटसोबतच मेस्सी यांचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड (Clothing Brand) आणि मेस्सी स्टोअर (Messi Store) देखील आहे. त्यांच्या या व्यवसायाचे मूल्य 150 ते 200 दशलक्ष डॉलर्स इतके आहे. त्यामुळे अशा प्रकारे मेस्सीने स्वताचा बँडही मोठा केला आहे. जगात प्रत्येक कोपऱ्यात त्याचे चाहते आहे. त्याचा प्रत्यय भारतात ही आला. त्याच्यासाठी हजारो लोक एकाच वेळी रस्त्यावर आल्याचे पाहीले.