फुटबॉलचा महान खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) सहभागी होत असलेल्या बहुप्रतिक्षित "GOAT इंडिया टूर 2025" मुळे संपूर्ण देशात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. आपल्या आवडत्या अर्जेंटिनाच्या खेळाडूला पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने तिकीट बुकिंग करत आहेत. या दौऱ्यात चाहत्यांना मेस्सीसोबत व्यक्तिगत भेट घेण्याची अविस्मरणीय संधी मिळत आहे. पण त्यासाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे.
10 लाखांचे प्रीमियम पॅकेज
चार शहरांमध्ये आयोजित या दौऱ्याच्या आयोजकांनी स्पष्ट केली आहे की, मेस्सीसोबत फोटो काढण्याच्या प्रीमियम मीट-अँड-ग्रीट पॅकेजची किंमत एका व्यक्तीसाठी 10 लाख रुपये असेल. यात फॅनला मेस्सीला भेटणे, त्याच्याशी हस्तांदोलन करणे आणि प्रोफेशनल ग्रुप फोटोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. या खास अनुभवात एका तासासाठी प्रायव्हेट लाउंजमध्ये प्रवेश, निवडक खाद्यपदार्थ आणि पेये, तसेच मुख्य स्टेडियम कार्यक्रमासाठी कॉम्प्लिमेंटरी हॉस्पिटॅलिटी कॅटगरीचे तिकीट देखील समाविष्ट आहे.
दौऱ्याचे स्वरूप आणि ठिकाणे
या GOAT टूरचे आयोजन स्पोर्ट्स प्रमोटर सतरु दत्ता यांच्या 'ए सतरु दत्ता इनिशिएटिव्ह' द्वारे केले जात आहे. आठ वेळा बॅलोन डी'ओर (Ballon d'Or) जिंकलेला मेस्सी 13 ते 15 डिसेंबर दरम्यान मुंबई, कोलकाता, दिल्ली आणि हैदराबाद या चार शहरांचा दौरा करणार आहे. त्याचे माजी बार्सिलोना (Barcelona) संघातील सहकारी लुईस सुआरेझ (Luis Suárez) आणि अर्जेंटिनाचा मिडफिल्डर रोड्रिगो डी पॉल (Rodrigo De Paul) देखील मेस्सीसोबत असतील.
(नक्की वाचा- Lionel Messi in kolkata: लिओनेल मेस्सीचा 'या' आलिशान हॉटेलमध्ये मुक्काम! रुम नं. 730 चे भाडे किती?)
कुठे असतील कार्यक्रम?
- मुंबई- वानखेडे स्टेडियम
- दिल्ली - अरुण जेटली स्टेडियम
- हैदराबाद- राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
- कोलकाता - विवेकानंद युवा भारती क्रीडांगण
व्हीआयपी मीट-अँड-ग्रीट ठिकाणे
- मुंबई - CCI–ब्रॅबोर्न स्टेडियम
- हैदराबाद- फलकनुमा पॅलेस
- कोलकाता - हयात रीजेंसी
तिकिटांचे दर (सर्वसाधारण कार्यक्रम)
- हैदराबाद: 2,250 रुपये
- कोलकाता: 4,366 रुपये
- दिल्ली: 9,440 रुपये