चेन्नई सुपरकिंग्सच्या एका पोस्टने फॅन्सची धाकधूक वाढली आहे. चेन्नई फ्रेन्चायजी आज मोठी घोषणा करणार आहे, असं या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे. मात्र ती घोषणा काय असेल याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. चेन्नईच्या आणि क्रिकेट फॅन्सना शंका आहे की एमए चिदंबरम स्टेडियममध्ये महेंद्रसिंह धोनीचा आयपीएलचा शेवटचा सामना तर नाही ना.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चेन्नई सुपरकिंग्सने आपल्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करत म्हटलं की, "सर्व सुपरफॅन्सना विनंती आहे की सामना संपल्यानंतर ही उपस्थित राहा. तुमच्यासाठी काही विषेश होणार आहे."
(नक्की वाचा- 'तो कॅप्टन आहे, कुणी... KL राहुलच्या बचावासाठी पुढं आला शमी, लखनौच्या मालकांना सुनावलं)
चेन्नईच्या पोस्टनंतर फॅन्सची धाकधूक वाढली आहे. धोनी आज निवृत्तीची घोषणा करणार की काय? असा प्रश्न फॅन्सचा पडला आहे. मात्र काही फन्स सकारात्मक विचार करत आहेत. धोनीची निवृत्ती आणि चेन्नई सुपरकिंग्सच्या पोस्टचा काहीच संबंध नाही. मात्र या पोस्टमधून फ्रॅन्चायजीला काय सांगायचं आहे, हे सामना संपल्यानंतरच कळणार आहे.
(नक्की वाचा - हार्दिकच्या कॅप्टन्सीमध्ये अहंकार झळकतो, एबी डिविलियर्सचा पंड्यावर निशाणा)
जर धोनीने आज आपल्या निवृत्तीची घोषणा केली तर आज त्याच्या आयपीएल कारकीर्दितील शेवटचा सामना असू शकतो. कारण सीएसके टॉप 4 मधून प्लेऑपमध्ये पोहोचणे अजूनही कठीण आहे. त्यामुळे जर चेन्नई प्लेऑफमध्ये पोहोचली नाही तर धोनीचा आज शेवटचा सामना असू शकतो. त्यामुळे फ्रॅन्चायजी आपल्या स्टार खेळाडूला शानदार निरोप देऊ शकते. मात्र या पोस्टचा नेमका अर्थ काय आहे, हे सामना संपल्यानंतरच समजू शकेल.