आऊट होण्याचा हा काय प्रकार? केन विल्यमसनची विकेट पाहून डोक्याला लावाल हात, Video

Kane Williamson Wicket : न्यूझीलंडचा दिग्गज बॅटर केन विल्यमसनही विचित्र पद्धतीनं आऊट झाला. ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kane Williamson : इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या टेस्टमध्ये केन विल्यमसन विचित्र पद्धतीनं आऊट झाला.
मुंबई:

Kane Williamson, New Zealand vs England, 3rd Test: क्रिकेटच्या मैदानात बॅटर अनेकदा विचित्र पद्धतीनं आऊट होतात. ते पाहून पटकन विश्वास बसत नाही. न्यूझीलंडचा दिग्गज बॅटर केन विल्यमसनही एका विचित्र पद्धतीनं आऊट झाला. न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरी टेस्ट सध्या हेमिल्टनमध्ये सुरु आहे. या टेस्टमध्ये मॅथ्यू पॉट्सच्या बॉलिंवर विल्यमसननं स्वत:च्या चुकीनं विकेट गमावली. ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नेमकं काय घडलं?

न्यूझीलंडच्या इनिंगमधील 59 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. मॅथ्यू पॉट्स ती ओव्हर टाकत होता. पॉट्सनं त्या ओव्हरमधील शेवटचा बॉल स्टंपच्या दिशेनं टाकला. विल्यमसननं तो हलक्या हातानं बचावात्मक पद्धतीनं खेळून काढला. पण, दुर्दैवानं बॉल त्याच्या बॅटला लागून स्टंपला धडकला.

केन विल्यनसनला निराश अवस्थेत मैदान सोडावं लागलं. मैदान सोडत असताना त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. आऊट होण्यापूर्वी विल्यमसन सेट झाल्यासारखा वाटत होता. पण, दुर्दैवानं विल्यमसनला मैदान सोडावं लागलं. 

Advertisement

( नक्की वाचा : Champions Trophy 2025 : भारत आणि पाकिस्तानमध्ये तोडगा निघाला, 'या' पद्धतीनं होणार सामने )

विल्यमसननं आऊट होण्यापूर्वी 44 रन केले होते. त्यानं 87 बॉलमध्ये 9 फोरच्या मदतीनं हे रन काढले. हेमिल्टन टेस्टच्या पहिल्या दिवसाच्या अखेरपर्यंत न्यूझीलंडनं 9 आऊट 315 रन केले. न्यूझीलंडकडून कॅप्टन टॉम लॅथमनं सर्वात जास्त 63 रन केले. मिचेल सँटनर 50 धावांवर नाबाद आहे. त्याच्या हाफ सेंच्युरीमुळेच न्यूझीलंडला 300 रनचा टप्पा ओलांडता आला. 
 

Topics mentioned in this article