IPL 2025 : धोनीच्या भवितव्याला BCCI च्या नियमाचा अडथळा, आजच्या बैठकीत होणार निर्णय?

MS Dhoni's future with CSK: महेंद्रसिंह धोनी पुढचा आयपीएल सिझन खेळणार की नाही हे BCCI च्या एका नियमावर अवलंबून आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
M
मुंबई:

MS Dhoni's future with CSK:  इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) चा सिझन संपून काही महिने उलटले आहेत. त्यानंतरही माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) पुढचा सिझन खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. गेल्या सिझनच्या सुरुवातीला धोनीनं कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कॅप्टन झाला.

गायकवाडच्या नेतृत्त्वामध्ये चेन्नईला आयपीएल 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश करता आला नाही. पण, त्याच्या कॅप्टनसीनं सर्वांना प्रभावित केलं. आता धोनी पुढचा आयपीएल सिझन खेळणार की नाही? याची सर्वांना उत्सुकता आहे. धोनी किंवा सीएसकेनं याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. याबाबतच्या ताज्या माहितीनुसार बीसीसीआयच्या एका नियमावर स्पष्ट होणार आहे.

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

BCCI काय निर्णय घेणार?

आयपीएलचे मेगा ऑक्शन पुढच्या वर्षी होणार आहे. या ऑक्शनपूर्वी बीसीसीआय फ्रँचायझींना किती खेळाडू रिटेन करण्याची परवानगी देणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याबाबतच्या रिपोर्टनुसार बीसीसीआयनं प्रत्येक फ्रँचायझींना 5-6 खेळाडू रिटेन करण्याची परवानगी दिली तरच धोनी पुढच्या सिझनमध्ये खेळण्याची शक्यता आहे.

CSK कुणाला करणार रिटेन?

यापूर्वीच्या मेगा ऑक्शनपूर्वी बीसीसाआयनं सर्व फ्रँचायझींना जास्तीत जास्त 4 खेळाडू रिटेन करण्याची परवानगी दिली होती. पुढील सिझनसाठी देखील हा नियम कायम राहिल्यास सीएसके कॅप्टन ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, पथिराना आणि शिवम दुबे या चार खेळाडूंना रिटेन करण्याची शक्यता आहे. अर्थात या खेळाडूंचा रिटेन करण्याचा नंबर वेगळा असू शकतो.

Advertisement

( नक्की वाचा : धोनी IPL मधून कधी रिटायर होणार? CSK च्या अधिकाऱ्याचा मोठा खुलासा )

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार सर्व फ्रँचायझी मालकांनी जास्त खेळाडूंना रिटेन करण्याची मागणी बीसीसीआयकडं केली होती. पण, तसं झालं तर प्रत्यक्ष लिलावात खेळाडूंची संख्या कमी होईल आणि त्याचा लिलावातील थरारावर परिणाम होईल, असं बीसीसआयचं मत आहे. 

बीसीसीआय आणि सर्व आयपीएल फ्रँचायझीच्या मालकांची बुधवारी (31 जुलै)  मुंबईत बैठक आहे. या बैठकीत पुढील आयपीएल सिझनसंबंधी सर्व विषयांवर चर्चा होणार आहे. या बैठकीनंतरच धोनीचं भवितव्य स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 
 

Advertisement
Topics mentioned in this article