Neeraj Chopra: ऑलिम्पिक मेडल विजेता निरज चोप्रा विवाह बंधनात अडकला, कोण आहे त्याची पत्नी?

विवाह झाल्यानंतर निरज चोप्राने आपल्या X अकाऊंटवरून याबाबतची माहिती सर्वांना दिली. शिवाय विवाहाचे फोटोही शेअर केले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

Neeraj Chopra Got married: ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या निरज चोप्राने आपल्या चाहत्यांना एक आश्चर्याचा धक्का दिला आहे. तो रविवारी विवाह बंधनात अडकला. हा विवाह सोहळा गोपनिय ठेवण्यात आला होता. या विवाह सोहळ्यासाठी कुटुंबातील मोजक्याच लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. विवाह झाल्यानंतर निरज चोप्राने आपल्या X अकाऊंटवरून याबाबतची माहिती सर्वांना दिली. शिवाय विवाहाचे फोटोही शेअर केले आहेत. त्यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षावर होत आहेत.    

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

नवविवाहीत जोडप्यांचे फोटो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. निरज चोप्राने नुकतीच एक मुलाखत दिली होती. त्यानंतर तो इतक्या लवकर लग्न करेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. मात्र निरजने सर्वांचा अंदाज खोटा ठरवत, आश्चर्याचा धक्का दिला आहे. हा विवाह सोहळ रविवार पार पडला. दोन्ही कुटुंबातील मोजके लोक या विवाह सोहळ्यात सहभागी झाले होते.   

ट्रेंडिंग बातमी - Wankhede@50: शेवटची मॅच वानखेडेवरच का खेळायची होती? सचिननं 'राज' खोललं

निरज चोप्राने काही मोजकेच फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. त्यात तिन फोटो आहोत. एक फोटोमध्ये निरज पत्नी हिमानी बरोबर दिसत आहेत. त्यात ते विवाहाचा एक विधी पार पाडताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये त्याचे कुटुंबीय त्याच्या सोबत आहेत. तर तिसऱ्या फोटो मध्ये निरजची आई त्याला हळद लावताना दिसत आहे. विवाहानंतर निरजला त्याचे चाहते शुभेच्छा देत आहेत. शिवाय त्याच्या लग्नाचे फोटोही आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - Wankhede@50: ...नंतर पाकिस्तान मुंबईत कधीच खेळलं नाही, 1991 साली वानखेडेवर काय घडलं?
 

निरज चोप्रा हा जगातला आघाडीचा भालाफेकपटू आहे. त्याने ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला आतपर्यंत दोन पदकं जिंकून दिली आहेत. त्यात एक गोल्ड तर एक सिल्व्हर मेडलचा समावेश आहे. जागतिक स्पर्धेतही निरजने आपला दबदबा दाखवून दिला आहे. दरम्यान ऑलिम्पिक स्पर्धेनंतर निरजच्या विवाहाच्या अफवा उडत होत्या. मात्र त्याने त्यावर कधी जाहीर वक्तव्य केलं नाही. अखेर तो रविवारी विवाह बंधनात अडकला. 
 

Advertisement