Shoaib Akhtar : लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, शोएब अख्तरनं काढली हेड कोचची लायकी!

Shoaib Akhtar blasted at Mike Hesson: वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच झालेल्या वन-डे सीरिजमधील पराभवाचे जोरदार पडसाद पाकिस्तान क्रिकेटमध्ये उमटले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Shoaib Akhtar : शोएब अख्तरनं हेड कोचवर जोरदार टीका केली.
मुंबई:

Shoaib Akhtar blasted at Mike Hesson: वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच झालेल्या वन-डे सीरिजमधील पराभवाचे जोरदार पडसाद पाकिस्तान क्रिकेटमध्ये उमटले आहेत. पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरनं टीमचा हेड कोच माईक हेसन यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. 

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजमधील पहिला सामना जिंकत पाकिस्ताननं चांगली सुरुवात केली होती.  पण, नंतर त्यांची कामगिरी खालावली. दुसरा सामना वेस्ट इंडिजनं 5 विकेट्सनं जिंकला. तिसऱ्या आणि निर्णायक मॅचमध्ये वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा 202 रन्सने मोठा पराभव केला. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली. पाकिस्तानचा वेस्ट इंडिज विरुद्ध तब्बल 35 वर्षांनी वन-डे सीरिजमध्ये पहिल्यांदाच पराभव झाला आहे. 

तिसऱ्या वन-डेमध्ये पाकिस्तानची टीम 92 रन्सवर ऑल आऊट झाली. त्यानंतर अख्तरनं नाराजी व्यक्त केली. 'बॉलर्सना मदत करणाऱ्या परिस्थितीमध्ये पाकिस्तानी बॅटर चांगली बॅटिंग करू शकले नाहीत,' असा दावा अख्तरनं केला. 

( नक्की वाचा : IND vs PAK: 'इतकं बेकार मारतील...', पाकिस्तान घाबरला! माजी खेळाडूनं केली मॅच न होण्याची प्रार्थना )
 

अख्तर पुढे म्हणाला, 'माइक हेसन टी20 मध्ये एक चांगले कोच आहेत, पण वनडेमध्ये त्यांची काय योग्यता आहे हे मला माहीत नाही. या फॉर्मेटमध्ये तुमच्याकडे चांगले खेळाडू नसतील, तर असेच होणार आहे.' तो सामन्यानंतर म्हणाला, ‘जोपर्यंत तुम्ही चांगले ऑलराऊंडर, बॅटर, बॉलर आणि स्पिनर मैदानात उतरवत नाहीत, तोपर्यंत तुम्ही 50 ओव्हर्सचा पूर्ण सामना खेळू शकणार नाही.

Advertisement

हे खराब धोरणांचे परिणाम आहेत. यात खेळाडूंची काहीच चूक नाही. पेसरला मदत करणाऱ्या पिचवर तुमच्या खेळाडूंची पोलखोल होईल. आता याला पुनर्रचना प्रक्रियेने नवीन नाव दिले आहे. सुदैवाने या सिरीजमध्ये पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क नव्हते. जेव्हाही अशी परिस्थिती निर्माण होईल, तेव्हा आपल्या खेळाडूंची पोलखोल होईल.'
 

Topics mentioned in this article