जाहिरात

IND vs PAK: 'इतकं बेकार मारतील...', पाकिस्तान घाबरला! माजी खेळाडूनं केली मॅच न होण्याची प्रार्थना

Asia Cup 2025: भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आशिया कप क्रिकेटमधील सामना 14 सप्टेंबर रोजी होणार आहे.

IND vs PAK: 'इतकं बेकार मारतील...', पाकिस्तान घाबरला! माजी खेळाडूनं केली मॅच न होण्याची प्रार्थना
India vs Pakistan Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान मॅचकडं संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय.
मुंबई:

Basit Ali Makes Shicking Plea Ahead Of Asia Cup 2025: भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आशिया कप क्रिकेटमधील सामना 14 सप्टेंबर रोजी होणार आहे. दोन्ही देशांमधील क्रिकेट मॅचकडं संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष असतं. त्यातंच यंदा पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिल्यांदाच दोन्ही टीम आमने-सामने येत आहेत. त्यामुळे आगमी लढतीला विशेष महत्त्व आहे. टीम इंडियाविरुद्ध होणाऱ्या मॅचपूर्वी पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण आहे. माजी क्रिकेटपटूनं त्याची कबुलीच दिली आहे.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अलीनं केलेल्या एका वक्तव्याची क्रिकेट फॅन्समध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. 'भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कपमध्ये सामना होऊ नये, अशी प्रार्थना मी करतोय.' असं अलीनं सांगितलं.

का आहे भीती?

'द गेम प्लान' या यूट्यूब चॅनलवर बोलताना बासित अली म्हणाला की, "मला आशा आहे की भारत एशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार देईल. जसे त्यांनी नुकतेच वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL) मध्ये केले होते. कारण भारत आपल्याला इतक्या वाईट पद्धतीने हरवेल की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही."

( नक्की वाचा : Shahid Afridi : लाज गेली! मैदान सोडून गेली भारतीय टीम, फक्त बघत बसला आफ्रिदी, पाहा Video )

पाकिस्तान क्रिकेट टीमची सध्याची कामगिरी अतिशय खराब आहे. याच कारणामुळे भारत पाकिस्तानचा मोठा पराभव करेल, अशी बासित अलीला खात्री वाटतीय.  कतेच त्रिनिदादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानला मोठा पराभव पत्करावा लागला.

या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम बॅटिंग करताना 50 ओव्हर्समध्ये 6 आऊट 294 रन्स केले होते. त्यानंतर यजमान टीमनं जेडन सील्सच्या विक्रमी 6 विकेट्सच्या जोरावर पाकिस्तानला केवळ 92 रन्समध्ये गुंडाळले. अशा प्रकारे, त्यांनी हा सामना 202 रन्सनं जिंकला.

पाकिस्तानचा ऐतिहासिक पराभव
हा पराभव पाकिस्तानसाठी 1975 नंतरचा 200 पेक्षा जास्त  फरकाने झालेला पहिला वनडे पराभव होता. या पराभवामुळे पाकिस्तानने ही मालिकाही 1-2 ने गमावली,  1991 नंतर वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांचा पहिला वनडे मालिका पराभव होता. या भयानक पराभवामुळेच बासित अली म्हणाला आहे की, एशिया कपमध्ये भारतासोबत सामना होऊ नये, अन्यथा पाकिस्तानला आणखी एका मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागेल.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com