IND vs PAK : पाकिस्तानची पुन्हा लाज गेली! नो-हँडशेकवरून धमकी, पण जय शाह यांच्या भीतीने घेतला 'यू टर्न'

India vs Pakistan Asia Cup 2025 :  पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) जोरदार आदळाआपट केल्यानंतर पुन्हा 'यू टर्न' घेतला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
India vs Pakistan Asia Cup 2025 : भारतीय टीमनं पाकिस्तानच्या खेळाडूंना हस्तांदोलन (No-handshake)  करण्यास नकार दिला होता.
मुंबई:

India vs Pakistan Asia Cup 2025 :  आशिया कप स्पर्धेत भारताविरुद्ध पाकिस्तानचा मानहानीकारक पराभव झाला. टीम इंडियानं सर्वच आघाड्यांवर वर्चस्व गाजवत हा सामना 7 विकेट्सनं जिंकला. मैदानातील लाज गेल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट टीमची मैदानाच्या बाहेरही लाज गेली. भारतीय टीमनं पाकिस्तानच्या खेळाडूंना हस्तांदोलन (No-handshake)  करण्यास नकार दिला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं  (PCB)  या कृतीवर जोरदार आदळाआपट केली. त्यांनी आशिया कपमधून बाहेर पडण्याचीही धमकीही दिली होती. पण, पाकिस्ताननं पुन्हा एकदा   'यू-टर्न' (U-turn) घेण्याचे संकेत दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना पदावरून न हटवल्यामुळे, 'पीसीबी'ने संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्धच्या आगामी सामन्यावर बहिष्कार घालण्याची धमकी दिली होती. भारताविरुद्धच्या सामन्यात 'नो-हँडशेक'च्या प्रकरणाशी पायक्रॉफ्ट यांचा संबंध असल्याचा आरोप 'पीसीबी'ने केला होता.

'पीसीबी'ची विनंती 'आयसीसी'ने (ICC) फेटाळली, या प्रकरणी आयसीसीनं पायक्रॉफ्ट यांना 'क्लीन चिट' दिली. 'आयसीसी'च्या या निर्णयानंतर पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, आता 'पीसीबी'ने आपला निर्णय मागे घेतला असून, स्पर्धेत कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेतून माघार घेतल्यास 'आयसीसी'कडून निर्बंध (sanction) लादले जाण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

( नक्की वाचा : IND vs PAK: पराभवानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ, शाहिद आफ्रिदीने जावई शाहीनला सर्व जगासमोर झापले ! पाहा Video )
 

'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या माहितीनुसार, 'पीसीबी'च्या एका सूत्राने सांगितले की, "आशिया कपमधून माघार घेणे 'पीसीबी'साठी शक्य नाही. आम्ही असा निर्णय घेतला, तर जय शाह यांच्या नेतृत्वाखालील 'आयसीसी' 'पीसीबी'वर कठोर निर्बंध लादेल आणि सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता हे परवडणारे नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर, जिथे सर्व स्टेडियमची दुरुस्ती करण्यात आली, 'पीसीबी'ची आर्थिक स्थिती चांगली नाही."

'पीसीबी'ची आर्थिक स्थिती बिकट असल्याने, आशिया कपमधील प्रगती देशाच्या क्रिकेटसाठी खूप महत्त्वाची आहे.

'आयसीसी' आणि 'एशियन क्रिकेट कौन्सिल'कडे (ACC) केलेल्या तक्रारीत, पाकिस्तान क्रिकेट टीमचे मॅनेजर नावेद चीमा यांनी आरोप केला होता की, पायक्रॉफ्ट यांच्या आग्रहामुळे रविवारी दोन कर्णधारांमध्ये टीम-शीटची देवाणघेवाण झाली नाही.

भारताने सात विकेट्सने जिंकलेल्या या सामन्यानंतर, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील (terror attack) पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांचं स्मरण करत सूर्यकुमार यादव आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही.

पायक्रॉफ्ट हे 'आयसीसी'च्या एलिट पॅनेलमध्ये (Elite Panel) सर्वात वरिष्ठ रेफ्रींपैकी एक आहेत, त्यांच्या नावावर 695 आंतरराष्ट्रीय सामने (पुरुष आणि महिला) आहेत.

Advertisement

'पीटीआय'च्या अहवालानुसार, 'पीसीबी'चे क्रिकेट ऑपरेशन्स संचालक उस्मान वाल्हा यांनी पाकिस्तान टीमच्या कॅप्टनला नियमांची माहिती दिली नसल्याने ही परिस्थिती उद्भवली.

या अहवालात पुढे असे म्हटले आहे की, 'पीसीबी'चे प्रमुख मोहसीन नक्वी, जे 'एसीसी'चे विद्यमान अध्यक्ष देखील आहेत, यांनी सोमवारी राष्ट्रीय संघाची आणि कर्णधाराची मानहानी केल्याबद्दल वाल्हा यांना बडतर्फ करण्याचे आदेश दिले.
 

Topics mentioned in this article