पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश (Pakistan vs Bangladesh) यांच्यात रावळपिंडीमध्ये पहिली टेस्ट सुरु आहे. या टेस्टमध्ये पाकिस्ताननं पहिली इनिंग 6 आऊट 448 रनवर घोषित केली. पहिल्या दिवसाच्या खराब सुरुवातीनंतर पाकिस्ताननं दुसऱ्या दिवशी कमकॅक केलं. सऊद शकील आणि मोहम्मद रिझवान यांच्या सेंच्युरीमुळे पाकिस्तानला चांगला स्कोअर करता आला. शकील 141 रनवर आऊट झाला. तर रिझवान 171 रनवर नाबाद राहिला.
( नक्की वाचा : Jay Shah : जय शाह होणार ICC चे बॉस, करणार नवा रेकॉर्ड )
रिझनान 171 रनवर खेळत असतानाच पाकिस्तानचा कॅप्टन शान मसूदनं इनिंग घोषित केली. त्यामुळे नवा वाद सुरु झाला आहे. अनेक पाकिस्तानी फॅन्सनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केलीय. रिझवानची डबल सेंच्युरी होण्यापूर्वीच मसूदनं हा निर्णय का घेतला? त्याला डबल सेंच्युरीपासून रोखण्यासाठी कॅप्टननं कट केला होता का? असे प्रश्न सध्या विचारले जात आहेत.
पाकिस्तानची इनिंग संपल्यानंतर रिझवानचा सहकारी साऊद शकीलला या निर्णयाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यानं रिझवानला या निर्णयाची एक तासपूर्वीच कल्पना दिली होती, असा दावा केला. 'इनिंग घोषित करण्यात घाई झालीय असं मला वाटत नाही. इनिंग कधी घोषित होणार आहे याबाबत रिझवानला एक तासपूर्वीच कल्पना देण्यात आली होती. त्यावर रिझवाननं आपण तोपर्यंत टीमचा स्कोअर 450 पर्यंत नेण्याचा प्रयत्न करु असं सांगितलं होतं, असं शकीलनं स्पष्ट केलं.