'ती मी नव्हेच!' स्मृती-पलाश प्रकरणात मोठा ट्विस्ट; 'त्या' कथित कोरिओग्राफरच्या नव्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

पलाश आणि मॅरी डिकोस्टा यांच्यातील संभाषणाचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

Smriti Mandhana-Palash Muchhal controversy: क्रिकेटर स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचं लग्न पुढे ढकलल्यानंतर इंटरनेटवर अफवा आणि निराधार बातम्यांचा सुळसुळाट झाला आहे. अशीच एक अफवा समोर आल्यानंतर मॅरी डी कोस्टाशी संबंधित आहे. हिच्यामुळे स्मृती-पलाशचं लग्न पुढे ढकलल्याचं सांगितलं जात आहे. पलाश आणि मॅरी डिकोस्टा यांच्यातील संभाषणाचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. डी कोस्टाने पलाश फ्लर्ट करीत असल्याच्या संभाषणाचे स्क्रिनशॉर्ट रेडिटवर शेअर केली होते. ते सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले. 

मॅरी डिकोस्टाने दिलं स्पष्टीकरण...

हे स्क्रिनशॉट समोर आल्यानंतर मॅरी ही तिच कोरिओग्राफर आहे जिच्यासोबत पलाशचे संबंध होते, अशी माहिती व्हायरल झाली. कोस्टामुळेच हे लग्न तुटल्याच्या मार्गावर असल्याचीही चर्चा रंगली. दरम्यान या प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोस्टाने स्वत: ही माहिती शेअर केली. तिने सांगितलं, मी पलाशला कधीच भेटले नाही. त्याच्यासोबत एक महिला बातचीत करीत होते. मी कोरिओग्राफर नसल्याचंही तिने स्पष्ट केलं. 
 

Advertisement

नक्की वाचा - Mukta Barve : 46 व्या वर्षीही अविवाहित; लग्नाचा विषय मुक्ताने दोन शब्दातच संपवला, पुन्हा कुणी विचारणारच नाही!

मॅरी डि'कोस्टा काय म्हणाली?

मी पलाशसोबत २९ एप्रिल ते ३० मे २०२६ दरम्यान पलाशसोबत संपर्कात होते. साधारण एक महिने आम्ही चॅट केलं. मी त्याला कधीच भेटले नाही आणि मी त्याच्यासोबत कोणत्याही प्रकारे जोडलेली नाही. आताच या बाबत का बोलतेय अशा प्रकारचे सवाल उपस्थित केले जात आहे. खरं म्हणजे मी जुलै महिन्यात त्याला एक्सपोज केलं होतं. मात्र त्यावेळी पलाशला कोणी ओळखत नव्हतं. त्यामुळे कोणीच याकडे लक्ष दिलं नाही. 
 

आधी पलाशने फ्लर्टी चॅट केले शेअर...

रेडिटवर डीकोस्टाने पलाशसोबतच्या चॅटचे स्क्रिनशॉट पोस्ट केले होते. स्क्रिनशॉट सोशल मीडियावरील अकाऊंट आणि डिस्प्ले इमेज आता हटविण्यात आले आहेत. मी कोण आहे, याबाबतही खूप गोंधळ आहे. मला स्पष्ट करायचं, मी कोरिओग्राफर नाही आणि मी त्याच्यासोबत केवळ चॅटिंग केलं होतं. सध्या खूप गुंतागुंत आहे. लोकांनी माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नये यासाठी हे स्पष्ट करीत आहे.
 

Advertisement