Palash Muchhal : पलाश मुच्छलच्या आयुष्यातील वादळ संपेना; स्मृतीच्या पोस्टनंतर जगणं झालंय कठीण

पलाश मुच्छल याने अद्याप इन्टाग्रामवरील स्मृती मानधनासोबतचा एक फोटो डिलिट केलेला नाही. त्यानंतर पलाशचं जगणं कठीण करुन सोडलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Palash Muchhal troll : स्मृती मानधनाने सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर अखेर चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.  स्मृती मानधनाने पलाश मुच्छलसोबतचं लग्न रद्द झाल्याचं जाहीर केलं. त्यानंतर पलाश मुच्छलनेही त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील स्मृती मानधनासोबतचे फोटो, व्हिडिओ डिलिट केले. 

पलाश मुच्छलवर फसवणुकीचा आरोप...

पलाश मुच्छलने स्मृती मानधनाला धोका दिल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. अनेक व्हॉट्सअॅप चॅट शेअर करीत पलाश मुच्छलवर स्मृती मानधनाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला. 

पलाश मुच्छलचं जगणं झालंय कठीण...

स्मृती मानधानाच्या पोस्टनंतर पलाश मुच्छलने सोशल मीडियावरील स्मृती मानधनासोबतचे फोटो आणि व्हिडिओ डिलिट केले. यानंतर मात्र पलाश मुच्छल सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. एका वापरकर्त्याने तर त्याला इन्स्टाग्राम अकाऊंट डिलिट करण्याचा सल्ला दिला आहे. इन्स्टाग्रामवरील स्मृती मानधनासोबतचा एक फोटो डिलिट केलेला नाही. त्यावर अनेकांनी फोटो डिलिट करण्याचा सल्ला दिला आहे. तर एकाने लिहिलंय, स्मृती मानधनासोबतचे सर्व फोटो डिलिट कर नाहीतर आरसीबी तुला सोडणार नाही. 

पलाश मुच्छलने DY पाटील स्टेडिअममध्ये स्मृती मानधनाला केले प्रपोज

पलाश मुच्छलने क्रिकेटर स्मृती मानधना नोव्हेंबर महिन्यात नवी मुंबईतील DY पाटील स्टेडिअममध्ये लग्नासाठी प्रपोज केले. याच मैदानात भारतीय महिला टीमने वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली होती, म्हणूनच ही जागा प्रपोज करण्यासाठी खास होती. स्मृतीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून पलाशने तिला मैदानात आणलं, गुडघ्यावर बसून अंगठी घातली आणि लग्नासाठी प्रपोज केलं. पलाशने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. याआधी स्मृतीनेही लग्नसोहळ्याची माहिती देणारा गंमतीशीर व्हिडीओ पोस्ट केला होता.   

Advertisement