Paris Olympics 2024 : गोल्ड मेडलचं स्वप्न भंगलं, अमन सेहरावतचा सेमी फायनलमध्ये पराभव

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक गोल्ड मेडल जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. कुस्तीपटू अमन सेहरावतचा (Aman Sehrawat) 57 किलोग्रॅम वजनी गटातील फ्री स्टाईल गटातील सेमी फायनलमध्ये पराभव झाला.

जाहिरात
Read Time: 1 min
मुंबई:

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक गोल्ड मेडल जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. कुस्तीपटू अमन सेहरावतचा (Aman Sehrawat) 57 किलोग्रॅम वजनी गटातील फ्री स्टाईल गटातील सेमी फायनलमध्ये पराभव झाला.  अमननं जपानच्या हिगुआची रेई या दिग्गज खेळाडूनं 0-10 असा मोठा पराभव केला पराभव केला. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात कुस्ती स्पर्धेची फायनल गाठणारा दुसरा भारतीय खेळाडू होण्याची अमनला संधी होती. यापूर्वी 2012 साली  सुशील कुमारनं 2012 मधील लंडन ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. सुशीलनं त्या ऑलिम्पिक स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकलं होतं. त्यानंतर 12 वर्षांनी या रेकॉर्डची बरोबरी करण्यात अमनला अपयश आलं. 

यापूर्वी अमननं क्वार्टर फायनलमध्ये अल्बानियाच्या जेलिमखान अबकारोवचा 12-0 नं पराभव केला होता.  या पराभवानंतरही ब्रॉन्झ मेडलच्या शर्यतीमध्ये अमन कायम आहे. आता त्यानं किमान ब्रॉन्झ मेडल जिंकावं ही सर्वांची अपेक्षा आहे.

Advertisement

(नक्की वाचा : Paris Olympics 2024 : अभिनंदन भारत! हॉकी टीमनं पटकावले ब्रॉन्झ मेडल, स्पेनचा केला थरारक पराभव )

Topics mentioned in this article