Neeraj Chopra Javelin Throw Final Paris Olympics 2024 : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकलं आहे. नीरजनं भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये 89.84 मीटर थ्रो करत सिल्व्हर मेडल पटकावलं. पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं यंदा गोल्ड मेडल पटकावत सर्वांनाच आश्चर्यचा धक्का दिला. अर्शदनं ऑलिम्पिक रेकॉर्डसह गोल्ड मेडल जिंकलं. ग्रेनडाच्या अँडरसन पीटरनं ब्रॉन्झ मेडल पटकावलं.
नीरजची फायनलमधील सुरुवात खराब झाली. त्याचा पहिला प्रयत्न फाऊल ठरला. नीरजनं दुसऱ्या प्रयत्नात 89.45 मीटरचा थ्रो केला. हा त्याचा या सिझनमधील बेस्ट थ्रो होता. नीरजचा तिसरा थ्रो देखील फाऊल ठरला. पण, दुसऱ्या थ्रो मधील कामगिरीच्या जोरावर नीरजनं फायनलमधील दुसऱ्या राऊंडमध्ये प्रवेश केला.
नीरजचा एकूण चौथा आणि दुसऱ्या राऊंडमधील पहिला थ्रो देखील फाऊल ठरला. नीरजवर पाचव्या राऊंडमध्ये मोठा दबा्व होता. या दबावात त्याचा पाचवा राऊंडही फाऊल गेला.
26 वर्षांच्या नीरजनं 2 दिवसांपूर्वी पात्रता फेरीत 89.84 मीटर भाला फेकत पहिला क्रमांक पटकावला होता. भारताला त्याच्याकडून गोल्ड मेडलची अपेक्षा होती. त्याला पॅरिसमध्ये त्याची पुनरावृत्ती करता आली नाही.
पाकिस्तानला गोल्ड मेडल
पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं दुसऱ्या प्रयत्नात 92.7 मीटर भाला फेकत ऑलिम्पिक रेकॉर्ड केला. अर्शदचा पहिला प्रयत्न फाऊल ठरला होता. त्यानंतर अर्शदनं जोरदार पुनरागमन करत ऐतिहासिक कामगिरी केली. अर्शद नदीमनं यापूर्वी 2022 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये 90 मीटरचा टप्पा ओलांडला होता.