पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पॅरिस ऑलिम्पिकला (Paris Olympics) जाणाऱ्या खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी भालाफेकपटू नीरज चोप्राशी (Neeraj Chopra) बोलताना पंतप्रधान चांगलेच मूडमध्ये होते. नीरज चोप्रांनी त्यांना, 'नमस्ते कसे आहात सर?' असं विचारलं. त्यावर पंतप्रधानांनी 'तसाच आहे', असं उत्तर दिलं. त्यानंतर मोदींनी नीरज चोप्राला तो प्रश्न विचारला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मोदी, चोप्रा आणि..
पंतप्रधानांनी नीारज चोप्राला हसत... 'अरे, तुझा चूरमा आलाच नाही,' असं विचारलं. त्यावर नीरज चोप्रा लाजला. त्यानं हसत 'सर नक्की घेऊन येईल. गेल्या वेळी दिल्लीमधील साखरेचा चूरमा होता. आता हरयाणामधील चूरमा घेऊन येईन आणि तो तुम्हाला खाऊ घालेल,' असं सांगितलं. त्यावर पंतप्रधान मोदींनी नीरजला मला तुझ्या आईच्या हातचा चूरमा खायचा आहे, असं सांगितलं. त्यावर नीरजनं नक्की सर, असं पंतप्रधानांना उत्तर दिलं.
नीरजनं दिलं होतं वचन
चूरमाचा हा किस्सा 3 वर्ष जुना आहे. पंतप्रधान मोदींनी 2020 मधील टोक्यो ऑलिम्पिकमधील पदकविजेत्या खेळाडूंसोबत ब्रेकफास्ट केला होता. त्यावेळी भालाफेकीत गोल्ड मेडल जिंकणाऱ्या नीरज चोप्रासोबत चूरमा खाल्ला होता. त्यावेळी नीरजनं मी तुम्हाला माझ्या घरातील चूरमा खाऊ घालेल असं वचन दिलं होतं. नीरज कदाचित ते विसरुन गेला असेल, पण पंतप्रधान मोदींना ते अजूनही लक्षात होतं.
( नक्की वाचा : PM मोदींच्या रोहित-द्रविडसह वर्ल्ड कप फोटोची का होतीय चर्चा? )
का लाजला नीरज?
नीरज चोप्रा यंदा पंतप्रधानांना भेटला तेंव्हा मोदींना जुना संदर्भ आठवला. त्यांनी तू माझ्यासाठी चूरमा आणलाच नाहीस, अशी आठवण करुन दिली. त्यावेळी कदाचित नीरजला जुना प्रसंग आठवला असेल. आपण आपलं वचन अद्याप पूर्ण केलेला नाही हे आठवल्यानं नीरज चोप्रानं लाजत मी तुम्हांला माझ्या हरयाणातील गावचा चूरमा खाऊ घालेल, असं सांगितलं.