Vinesh Phogat Disqualification Case: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटची याचिका आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादानं फेटाळली आहे. त्यामुळे विनेशला सिल्व्हर मेडल मिळणार नाही, हे स्पष्ट झालं आहे. CAS नं ही याचिका फेटाळली असल्याची माहिती NDTV ला सूत्रांनी दिली आहे.
विनेशला पॅरिस ऑलिम्पिकमधील तिच्या गटातील फायनलपूर्वी अपात्र ठरवण्यात आलं होतं. गोल्ड मेडल मॅचपूर्वी तिचं वजन 100 ग्रॅम जास्त भरल्यानं ही कारवाई झाली होती. या निर्णयाला भारतानं CAS कडं आव्हान दिलं होतं. त्यावर हा निर्णय आला आहे.
विनेश फोगाटनं महिलांच्या 50 किलो वजनी गटातील फ्री स्टाईल स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली होती. गोल्ड मेडलसाठी विनेशची लढत अमेरिकेच्या सारा हिल्डेंब्राट विरुद्ध होणार होता. अजिंक्यपदाच्या लढतीपूर्वी सकाळी विनेशचं वजन मोजण्यात आलं. त्यावेळी ते कमाल मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त होतं.
( नक्की वाचा : अर्शद नदीमनं चोळलं भारताच्या जखमेवर मीठ, लष्करच्या दहशतवाद्यासोबत दिसला पाकिस्तानचा चॅम्पियन, Video )
या निर्णयाच्या विरोधात भारतानं गेल्या बुधवारी CAS कडं याचिका दाखल केली होती. विनेश फोगाटला क्युबाच्या युस्नेलिस गुजमेन लोपेजसह संयुक्त सिल्व्हर मेडल द्यावं ही मागणी भारतानं केली होती. विनेशनं लोपाजचा पराभव केला होता. विनेश अपात्र ठरल्यानंतर लोपेझला फायनलसाठी पात्र ठरली होती.